CM Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee: ममता बॅनजी अडचणीत; राज्यपालांनी दाखल केला मानहानीचा खटला; काय आहे प्रकरण?

Mangesh Mahale

पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस (cv anand bose) आणि मुख्यमंत्री ममता बॅनजी (cm mamata banerjee) यांचा वाद न्यायालयात पोहचला आहे.राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर मानहानीचा खटला दाखल करणे ही देशातील पहिलीच घटना आहे. कोलकाता उच्च न्यायालयात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काही टीएमसी नेत्यांविरोधात राज्यपालांनी हा खटला दाखल केला आहे.

यापूर्वी 2 मे रोजी लोकसभा निवडणुकीदरम्यान राजभवनच्या एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप केला होता. ममता सरकारने या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे सोपवला होता. या मुद्द्यावरूनही राज्यात मोठा गदारोळ झाला होता. राज्यपालांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ममता सरकारने या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे सोपवला होता. त्याचवेळी राज्यपालांनी राजभवनात पोलिसांच्या प्रवेशावर बंदी घातली.

महिलांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती की, राजभवनातील कामकाजामुळे त्या तिथे जाण्यास घाबरत आहेत, असे ममता नुकत्याच म्हणाल्या आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.

२ मे रोजी झालेल्या प्रकरणी त्यांनी हेअर स्ट्रीट पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा आरोप आहे की, ती 24 मार्च रोजी कायमस्वरूपी नोकरीसाठी राज्यपालांकडे गेली होती. त्यानंतर राज्यपालांनी गैरवर्तन केले. गुरुवारी पुन्हा असाच प्रकार घडल्यानंतर ती तक्रार घेऊन राजभवनाबाहेर तैनात असलेल्या पोलिस अधिकाऱ्याकडे गेली.

या प्रकरणात राजभवनातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात हॉटेलमध्ये राज्यपालांच्या प्रवेशाची आणि बाहेर पडण्याची वेळ आणि महिलेने तिच्या तक्रारीत नमूद केलेली वेळ सारखीच असल्याचे तपास अहवालात म्हटले आहे.

राज्यपाल बोस यांच्याविरोधात लैंगिक छळाची अशीच एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका ओडिसी क्लासिकल डान्सरने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. ऑक्टोबर 2023 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT