Chhatrapati Sambhajinagar: मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांची छत्रपती संभाजीनगरात येत्या 13 जुलैला महासंवाद रॅली होणार आहे. मात्र या रॅलीला आता ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यांचा रॅलीला परवानगी देऊ नका, अशी मागणी ओबीसी नेते पोलिस आयुक्तांकडे करणार आहेत.
एकीकडे मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांच्या रॅलीची जोरदार तयारी सुरू आहे. गाव,तांडा,वस्ती वार्डात बैठका घेऊन रॅलीच्या दिवशी झेंडा फडकवा, असे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. केली आहे.
दुसरीकडे जरांगे पाटील दोन समाजातील निर्माण करून दंगल घडवण्याची काम करत असल्याचा आरोप करत त्यांच्या रॅलीला परवानगी देऊ नका, अशी मागणी आता ओबीसी नेते पोलिस आयुक्तांकडे करणार आहेत. त्यामुळे जरांगेंच्या रॅलीबाबत नवीन पेच निर्माण झाला आहे.
मराठा समाजाला सगे-सोयऱ्यांसहचे आरक्षण देणारा (Maratha Reservation) कायदा करावा, आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकाला १३ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात जरांगे यांची महासंवाद रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजमाता जिजाऊं चौक(केम्ब्रीज चौक)ते क्रांतीचौक अशी महासंवाद रॅलीचे आयोजन सकल मराठा समाजाने केले आहे. करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सर्वपक्षीय ओबीसी नेते हे त्यांच्या जातीचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिले आहेत. त्यामुळे मी एकटा पडलो असून आरक्षणाअभावी मराठा जात (Maratha Reservation) संकटात सापडली आहे, असे जरांगेंनी नुकतेच सांगितले.
"सत्ताधारी पक्षातील मराठे नेते माझ्या बाजूने बोलत नाही, त्यांनी मला उघडं पाडलं आहे. विरोधी पक्षातील खासदारही माझ्या बाजूने बोलत नाहीत. पण मराठा समाजाने एकजूट राहावे, ही माझी विनंती आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील, ते मोठे अधिकारी होतील, अशी भीती सगळ्यांना वाटते. त्यामुळे मी आरक्षणाच्या बाजूने उभं राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरले आहे. मी एकटा पडलो आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.