mamata banerjee sarkarnama
देश

Video Mamata Banerjee : पंतप्रधानांसमोरच संतप्त होत नीती आयोगाची बैठक सोडली, बाहेर येताच ममता बॅनर्जी सरकारवर तुटून पडल्या

Niti Aayog Governing Council Meeting : निती आयोगाच्या बैठकीसाठी 'इंडिया' आघाडीच्या घटकपक्षातील एकही नेता आणि मुख्यमंत्री सामील झाले नाहीत.

Akshay Sabale

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत नीती आयोगाची बैठक पार पडत आहेत. या बैठकीला 'इंडिया' आघाडीतील कुणाही उपस्थित नव्हते. पण, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठकीला सामील झाल्या होत्या.

मात्र, बैठक अर्ध्यातून सोडून मुख्यमंत्री बॅनर्जी संतप्त होत निघून गेल्या. बैठकीत बोलू न दिल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला आहे. यापुढे बैठकीत कधीही सामील होणार नाही, असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.

निती आयोगाच्या बैठकीसाठी 'इंडिया' आघाडीच्या घटकपक्षातील एकही नेता आणि मुख्यमंत्री सामील झाले नाहीत. पण, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांनी बैठकीसाठी हजेरी लावल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, बैठकीत 5 मिनिटेच बोलून दिल्यानंतर माईक बंद करण्यात आल्यानं मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "नीती आयोगाच्या बैठकीवर मी बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडून यांना 20 मिनिटे बोलण्यास दिले. आसाम, गोवा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री 10 ते 12 मिनिटे बोलले. मात्र, पाच मिनिटे बोलल्यानंतर माझा मला थांबवण्यात आलं. ही खूप चुकीची गोष्ट आहे. नीती आयोगाच्या बैठकीत विरोधी पक्षाकडून मी एकटीच प्रतिनिधित्व करत होती. संघराज्य पद्धत आणखीन मजबूत करण्यासाठी मी बैठकीला आले होते. नीती आयोगाला कोणतेही आर्थिक अधिकार नाहीत. ते कसं चालेल? नीती आयोगाला आर्थिक मदत करा किंवा नियोजन आयोग परत आणा. मी माझा निषेध नोंदवत बैठकीतून बाहेर पडले."

"केंद्र सरकार चालवत असताना सर्व राज्यांचा विचार करायला हवा. केंद्र सरकारकडून पश्चिम बंगालला कोणताही निधी दिला जात नाही, हे बोलत असतानाच माझा माईक बंद करण्यात आला. हा केवळ बंगालचा नाही तर सर्व प्रादेशिक पक्षांचाही अपमान आहे. हा माझाही अपमान आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT