Nirmala Sitharaman : महाराष्ट्राचा उल्लेख करत निर्मला सीतारामण संतापल्या; फडाफडा बोलून गेल्या...

Nirmala Sitharaman Reply Opposition Leader : विरोधक आणि खर्गेंनी केलेल्या दाव्यानंतर अर्थमंत्री सीतारामण राज्यसभेत भडकल्याच्या पाहायला मिळाल्या. तसेच, विरोधकांच्या आरोपांना अर्थमंत्री सीतारामण यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
nirmala sitharaman.jpg
nirmala sitharaman.jpgsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नसल्यानं 'जेडीयू' आणि 'टीडीपी'च्या 'टेकू'वर मोदी सरकार सत्तेत आले. त्यामुळे अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशाला देण्यात आलेल्या निधीतून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे मोदी सरकारचे 'लाडके भाऊ' ठरल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

तसेच, अर्थसंकल्प मांडताना महाराष्ट्रासह अन्य राज्यांचा उल्लेखही अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी टाळल्यावरून विरोध पक्षांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे ( Mallikarjun Kharge ) यांनी मोदी सरकारला घेरलं. विरोधक आणि खर्गेंनी केलेल्या दाव्यानंतर अर्थमंत्री सीतारामण राज्यसभेत भडकल्याच्या पाहायला मिळाल्या. तसेच, विरोधकांच्या आरोपांना अर्थमंत्री सीतारामण यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

मल्लिकार्जून खर्गे काय म्हणाले?

"अर्थसंकल्पात कुठल्याही राज्याला निधी मिळाला नाही. सगळ्यांच्या थाळ्या रिकाम्या राहिल्या आहेत. फक्त दोघांच्या थाळीत भजे आणि जलेबी देण्यात आली. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली, ओडिसाला काहीही मिळालं नाही. असा अर्थसंकल्प मी कधीही पाहिलं नाही," अशी टीका मल्लिकार्जून खर्गेंनी केली.

nirmala sitharaman.jpg
Video Mallikarjun Kharge : आधी सरकारवर तुटून पडले, नंतर 'माताजी' म्हणत खर्गेंनी उडवली सीतारामण यांची खिल्ली; धनखड हसत म्हणाले...

यावर भडकत सीतारामण ( Nirmala Sitaraman ) म्हणाल्या, "मी महाराष्ट्राचा उल्लेख केला नाही. पण, महाराष्ट्रासाठी 76 हजार कोटींचा निधी अर्थसंकल्पातून देण्यात आला आहे. प्रत्येक अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचा उल्लेख करताना येत नाही."

"अर्थसंकल्पात महाराष्ट्राचं नाव घेतलं गेलं नसल्याचं ते ( खर्गे ) म्हणाले. पण, याचा अर्थ महाराष्ट्राकडे आमचे लक्ष नाही, असं वाटते का? भाषणात एखाद्या राज्याचं नाव घेतलं नाही, तर त्या राज्यांना सरकारचा निधी मिळत नाही असा अर्थ होतो का? आम्ही राज्यांना निधी दिला नाही, असा खोटा प्रचार काँग्रेससह मित्रपक्ष करत आहे. हा आरोप निंदनीय आहे," असं सीतारामण यांनी म्हटलं.

nirmala sitharaman.jpg
Praniti Shinde : मनोज जरांगेच्या उपोषणाचा विषय थेट लोकसभेत; प्रणिती शिंदेंचा घणाघात

"काँग्रेसच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सर्व राज्यांच्या नावांचा उल्लेख केला का?" असा सवाल अर्थमंत्री सीतारामण यांनी उपस्थित केला.

तृमणूल काँग्रेसच्या खासदारांकडे बोट दाखवत अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या, "आता मला विचारण्याची हिंमत आहे का? गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारच्या अनेक योजना बंगाल सरकारनं लागू केल्या नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com