Suvendu Adhikari, Mamata Banerjee (AI Image) Sarkarnama
देश

Mamata Banerjee Setback : ममता बॅनर्जींना झटका, खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार? राजीनाम्यानंतर सुवेंदू अधिकारींसोबत बैठक, TMC चे 6 आमदारही हजर!

TMC Kakoli Ghosh CM Suvendu Adhikari : विधानसभा निवडणुकीच्या एका महिन्याच आताच टीएमसीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. टीएमसीचे सहा आमदार आणि एक खासदार मुख्यमंत्री अधिकारी यांनी घेलेल्या बैठकीला उपस्थित राहिल्याने पक्ष फूटीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Roshan More

Kakoli Ghosh News : पश्चिम बंगालमधील पराभवानंतर मममा बॅनर्जी यांच्यासमोरील संकटे संपण्याचे नाव घेत नाहीत. पार्टीमध्ये अंतर्गत नवेनवे वाद घडत आहेत. खासदारा काकोली घोष यांची भाजपशी जवळीक वाढत आहेत. त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

मिडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी प्रशासनाची समीक्षा बैठक घेतली. या बैठकीला खासदार काकोली घोष यांच्यासह टीएमसीचे सहा आमदार देखील उपस्थित होते. त्यामुळे टीएमसी फूटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काकोली घोष यांच्यासह बैठकीत आमदार अनीसूर रहमान बिश्वास, बीना मंडल, मोहम्मद अब्दुल मतीन तसेच बीरहाट क्षेत्रीतील तीन आमदार उपस्थित होते. काकोली घोष या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या मुलाने माध्यमांशी बोलताना म्हटले की, हा कुठल्या पक्षात जाण्याचा प्रश्न नाही तर भ्रष्टाचारा विरोधात उचललेले पाऊल आहे.

CM सुभेंदूच्या घोषणेमुळे भीती

मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांनी नगरपालिकांमधील जुन्या कामकाजाची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. जर चौकशीत घोटाळा आढळून आला तर कारवाई केली जाणार असे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर कोलकत्ताचे महापौर आणि ममता बॅनर्जींचे जवळचे नेते मानले जाणारे फिरहाद हकीम यांनी महापौर पदाचा राजीनामा देण्याची इच्छ व्यक्त केली आहे.

टीएमसीच्या 100 हून अधिक नगरसेवकांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. हे नगरसेवक आपल्या कार्यालयात देखील जात नसल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT