Mamata Banerjee sarkarnama
देश

West Bengal Results: पश्चिम बंगालमधील 'तृणमूल'ची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात; मुख्य सचिवांनी काढले महत्वाचे आदेश

BJP Political News: पश्चिम बंगालमध्ये 74 वर्षांच्या सत्तेच्या वनवासानंतर भाजपनं या विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. निकालात सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपनं मोठी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली होती. हेच चित्र अखेरपर्यंत कायम राहिले.

Deepak Kulkarni

West Bengal News: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यात भाजपनं पश्चिम बंगालची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिग्गज नेत्यांना बंगालमध्ये उतरवत भाजपनं यावेळी प्रचंड ताकद लावल्याचं दिसून आलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजपनं पश्चिम बंगालमध्ये दमदार कामगिरी करताना तब्बल 15 वर्ष सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का देत तृणमूल काँग्रेसला सत्तेच्या बाहेर घालवलं आहे. याचदरम्यान,आता राज्याच्या मुख्य सचिवांनी महत्त्वाचे आदेश काढले आहे.

पश्चिम बंगालमध्ये आता निकालाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. यात भाजप बहुमतानं सत्ता स्थापन करणार असल्याचं निश्चित झालं आहे. पक्षानं सध्या 207 जागा जिंकल्याची माहिती समोर येत आहे. तर तृणमूल काँग्रेसला अवघ्या 80 जागांवर समाधान मानावे लागले आहेत. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशातच

पश्चिम बंगाल राज्याचे मुख्य सचिव दुष्यंत नरियाला यांनी सोमवारी (ता.4 मे) आदेश दिले आहेत. मुख्य सचिवांनी सर्व विभागीय सचिवांना आणि मुख्य कार्यालयांना आदेश दिला आहे की, कोणताही महत्त्वाचा कागद किंवा फाईल कार्यालयातून बाहेर नेली जाणार नाही, तिला नुकसान पोहोचवले जाणार नाही किंवा तिची विल्हेवाट लावली जाणार नाही याची खात्री करावी. राज्याचे मुख्य सचिव दुष्यंत नरियाला यांनी हे आदेश दिले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये 74 वर्षांच्या सत्तेच्या वनवासानंतर भाजपनं या विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. निकालात सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपनं मोठी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली होती. हेच चित्र अखेरपर्यंत कायम राहिले. पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर यावेळी मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आलं.

भाजपने 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. या दिमाखदार यशानंतर भाजपकडून सर्वत्र विजयी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विजयानंतर मार्गदर्शन केलं.

यावेळी पंतप्रधान मोदींनी बंगालमधील जनतेसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये आयुषमान भारत योजनेला हिरवा झेंडा दाखवला जाईल असा शब्द दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT