Mamata Banerjee News: मोठी बातमी: ममता बॅनर्जींना धक्का,भवानीपूरमध्ये तब्बल 15 हजार मतांनी दारूण पराभव

TMC election loss : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचलं आहे. पण यानंतरही प्रचंड राडा झालेल्या भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी जिंकणार की हरणार? याकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते.
Mamata Banerjee
Mamata Banerjee News Sarkarnama
Published on
Updated on

West Bengal News: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालातील सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना त्यांच्या होमग्राऊंड असलेल्या भवानीपूर मतदारसंघातच धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचलं आहे. पण यानंतरही प्रचंड राडा झालेल्या भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी जिंकणार की हरणार? याकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. पण आता बॅनर्जी यांच्या भवानीपूर या मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे.

भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना तब्बल 15 हजार मतांनी पराभूत केले आहे. हा तृणमूलसह बॅनर्जी यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. सुवेंदू अधिकारी यांना 73,463 तर ममता बॅनर्जी यांना 58,349 मते एवढी मतं मिळाली. सलग दुसऱ्यांदा विद्यमान मुख्यमंत्रीपदी असताना ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे.

पश्चिम बंगाल,तमिळनाडू,पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम अशा पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.यात पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूत यावेळी ऐतिहासिकमतदान झाले होते.याचमुळे ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला शह देण्यात भाजपला यश आलं आहे. तर आसाममध्येही भाजपनं सत्तेची हॅट्रिक केली आहे.

Mamata Banerjee
Ambadas Danve News: विधान परिषदेवर बिनविरोध निवड, प्रमाणपत्र मिळताच अंबादास दानवेंनी थेट गाठली मातोश्री; पुढे काय घडलं..?

तृणमूलच्या अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहेत. त्यात आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांचा भवानीपूर हा वर्चस्व राहिलेला मतदारसंघ गमावण्याची वेळ आली आहे. भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूलशी जोरदार पंगा घेत भाजपला या निवडणुकीत मोठं यश मिळवून दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com