Bengal By Election: पश्चिम बंगालमध्ये तीन महिन्यांपूर्वी सत्ता बदल झाला आणि ममता बॅनर्जींची दोन टर्मचं सरकारला मत देत भाजपनं सत्ता काबिज केली. त्यानंतर अनेक राजकीय पडझडी पाहायला मिळाल्या. त्यानंतर आता तीनच महिन्यात लागलेल्या पोटनिवडणुकीत ममतांनी उभ्या केलेल्या नंदीग्रामच्या उमेदवारानं कालच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर दुसरी जागा रेजीनगरच्या उमेदवारानं देखील माघार घेत असल्याची घोषणा केली. पण अवघ्या तीन तासातच या उमेदवारानं युटर्न घेत आपण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं सांगत सर्वांना धक्काच दिला. ममता बॅनर्जी यांनीच हा गेम पलटल्याचं बोललं जात आहे.
तीन तासांपूर्वी टीम ममतामधील रेजीनगर मतदारसंघातील उमेदवार रबिबुल अलम चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली होती. पण आता त्यांनी आपण पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचं मीडियाशी बोलताना सांगितलं. ममता बॅनर्जींशी चर्चेनंतर चौधरी यांनी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. चौधरी यांनी म्हटलं की, "सध्या तृणमूल काँग्रेसच्या चिन्ह आणि नावावरुन कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगानं हे चिन्ह आणि नाव गोठवल्यानं आम्हाला नवं चिन्ह मिळालं आहे. पण मतदारांसाठी हे नवं चिन्ह ओळखणं कठीण काम आहे. त्यामुळं मी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. पण मी ममता बॅनर्जींशी बोललो त्यानंतर त्यांनीच मला सांगितलं की, जे तुम्हाला योग्य वाटतं ते करा"
चौधरी यांनी पुढे असंही सांगितलं की, "आपल्याला अर्ज मागे घेण्यासाठी कोणीही धमकावलं नाही किंवा दबावही टाकला नाही. पण ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांना पक्षाचं काम करत असताना धमक्या दिल्या जात आहेत. पण आपला निर्णय फिरवणाऱ्या चौधरी यांनी म्हटलं की, आपण आता शनिवारपासून प्रचाराला सुरुवात करणार आहोत" टेलिग्राफशी बोलताना त्यांनी सूचकपणे सांगितलं की, आपल्या प्रचारासाठी खुद्द ममता बॅनर्जी रेजिनगर मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत.
दरम्यान, चौधरी यांच्यापूर्वी नंदीग्रामच्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जींचे उमेदवार संचिता प्रधान डे यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतली आणि आपला उमेदवारी अर्ज काल मागे घेतला. यावरुन भाजपवर जोरदार टीका व्हायला लागली होती. कारण विरोधी उमेदवारानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं अर्ज मागे घेतल्यानं त्याच्यावर दबाव असल्याचा आरोप होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.