कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाने (ED)समन्स बजावले आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी (Coal Scam) अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना ईडीनं समन्स बजावले आहे.
दिल्लीमधील ईडीच्या मुख्यालयात हजर होण्याचे आदेश या दोघांना देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसच्या तीन ते चार नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. दोघांना वेगवेगळ्या दिवशी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. २१ मार्च रोजी अभिषेक बॅनर्जी यांची आणि त्यानंतर २२ मार्चला रुजिरा बॅनर्जी यांची ईडी चौकशी करणार आहेत.
11 मार्च रोजी त्यांना संचालनालयासमोर हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. मागील वर्षी 10 सप्टेंबर रोजी या दोघांना यापूर्वी समन्स बजावले होते. ते पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याने त्यांना दिल्लीत हजर राहण्यासाठी समन्स जारी करू नये, असे आदेश ईडीला द्यावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती.
याआधी ईडीनं पश्चिम बंगालचे मंत्री मोलॉय घातक यांना कोळसा घोटाळा प्रकरणात नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे सीबीआयनं तृणमूलचे बिरभूम जिल्ह्याचे प्रमुख अनुब्रता मोंडल यांना नोटीस बजावली आहे.
''केंद्रीय तपास यंत्रणा या पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे काम करू लागल्या आहेत. केंद्र सरकारच्या इच्छेनुसार या तपास यंत्रणा विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करीत आहे, अशी टीका काही दिवसापूर्वी ममता बॅनर्जी यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.