प्रविण दरेकरांना अटक होणार का ? ; आज सुनावणी

अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करा असे उच्चन्यायालयाने दरेकरांना सांगितले आहे.
 Pravin Darekar
Pravin Darekarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई: भाजप नेते आणि राज्याचे विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा न मिळाल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची दरेकर यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. (Pravin Darekar Plea Pre-arrest Bail news)

मुंबै बँक कथित घोटाळा प्रकरणात आता प्रविण दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अटकपूर्व जामिनावरील सुनावणीसाठी त्यांनी अर्ज केला आहे. तातडीची सुनावणी करावी, अशी मागणी दरेकरांच्या (Pravin Darekar) वकिलांनी सत्र न्यायालयाकडे केली आहे.

 Pravin Darekar
Congress:प्रियंकांचा राजीनामा का घेतला नाही ; जी-२३ नेत्यांचा पक्षश्रेष्ठींना सवाल

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या आदेशानुसार आज प्रविण दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करा असे उच्चन्यायालयाने दरेकरांना सांगितले आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दरेकर हे मजूर सहकारी संस्था मतदारसंघातून संचालक निवडून आले आहेत. २०१६ मध्ये विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या शपथपत्रात त्यांनी त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचे नमूद केले आहे. यावरुन दरेकर यांनी १९९९ पासून प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेतर्फे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर मजूर मतदारसंघातून २०२१ पर्यंत संचालक व अध्यक्षपद भूषविले. त्याचवेळी विधान परिषदेच्या शपथपत्रात मजूर असल्याची माहिती दडवून स्वतंत्र व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यांनी लोकसेवक या नात्याने राज्य सरकारची तसेच मुंबई बँकेच्या लाखो ठेवीदारांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले असल्याचेही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी सांगितले.

 Pravin Darekar
IPL:मनसे-ठाकरे सामना रंगणार ; शिवसेनेची भूमिका कधीच भूमिपुत्रांबाबत नव्हती..

मजूर संस्थेची दफ्तर तपासणी केली. त्यामध्ये दरेकर यांनी हजेरीपटावर सुपर वायजर अशी सही करुन संस्थेकडून केलेल्या कामाचे २७ हजार ७०० रुपये रोखीने घेतले आहेत. यावरुन दरेकर यांनी फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर (ता. १४ मार्च) ला गुन्हा दाखल झाला, अशी माहिती बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com