West Bengal Panchayat Election 2023 : पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या निर्विवाद यश मिळाले आहे. राज्याच्या उत्तर भागातही तृणमूल काँग्रेस मोठे यश मिळवले आहे.
राज्यातील ६३ हजार ग्रामपंयाचतींच्या जागांपैकी ३५ हजारांपेक्षा अधिक जागा जिंकून तृणमूलने आपली पकड कायम राखली आहे. भाजपला १० हजारांच्या आसपास जागा मिळाल्या. ग्रामीण भागातील आपली पकड अधिक घट्ट करण्यात मुख्यमंत्री बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना यश मिळाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सुमारे 74 हजार जागांवर तीन स्तरीय पंचायत निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीच्या 63 हजार 229 जागांसाठी निवडणुका आहेत. पंचायत समितीच्या 9 हजार 730 आणि जिल्हा परिषदेच्या 928 जागांचा समावेश आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) 2850 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने (Congress) 2369 जागांवर विजय मिळवला आहे. तर 9 हजार 730 पंचायत समितीच्या जागा आहेत. यामध्ये 6 हजार 473 जागांवर तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. भजपाला 1 हजार 014 जागांवर विजय मिळाला आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीला 185 तर काँग्रेसला 263 जागा मिळाल्या आहेत.
राज्यात 928 जिल्हा परिषदेच्या जागांवरही निवडणुका झाल्या. त्यामध्ये 759 जागांवर तृणमूलने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपाला (BJP) अवघ्या 24 जागांवरच समाधान मानावे लागेल आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीलाही 4 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसलाही फक्त 12 जागाच जिंकता आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता राखली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.