Rajya Sabha Election 2023 : राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा ; गुजरातमधून बाबूभाई देसाई..

BJP News : राज्यसभेच्या दहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
Rajya Sabha Election
Rajya Sabha Election Sarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha Election 2023 : आगामी राज्यसभा निवडणुकीबाबत भाजपने मोठी घोषणा केली आहे. आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा आज (बुधवारी) भाजपने केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यासाठी २४ जुलै रोजी मतदान होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या दहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात पश्चिम बंगालमध्ये सहा, गुजरातमध्ये तीन आणि गोव्यातील एका जागेसाठी ही निवडणूक होत आहे. गुजरातमधून दोन जागांसाठी बाबूभाई जेसंगभाई देसाई आणि केशरीदेव सिंह जाला यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Rajya Sabha Election
Nitesh Rane News : तृतीयपंथी समाजाविषयी केलेल्या विधानावर राणे ठाम ; बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा दिला संदर्भ..

बंगालमधून राज्यसभेसाठी राजवंशी समुदायाचे नेता व ग्रेटर कूचबिहार आंदोलनाचे प्रमुख अनंत महाराज यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी विदेशमंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेसाठी आपला अर्ज दाखल केला आहे.

बाबूभाई देसाई यांनी २००७ मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. बनारकांठा जिल्ह्यातील कांकेरेज विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. तर दुसरे उमेदवार केशरीदेव सिंह जाला हे राजघराण्याचे वंशज आहेत.

Rajya Sabha Election
ED Director Sanjay Mishra : सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला दणका ; ED संचालकांचा कार्यकाळ रोखला..

कोण आहेत अनंत महाराज ?

पश्चिम बंगालचे भाजप उमेदवार अनंत महाराज एक राजघराण्यातील आहेत. ते ग्रेटर कूच बिहार पीपुल्स असोसिएशनचे प्रमुख आहेत. ते अनेक वर्षापासून आंदोलनात सक्रीय आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com