Amit Shah Sarkarnama
देश

Manipur Politics: मणिपूरचे 26 आमदार आठवडाभरापासून दिल्लीत तळ ठोकून; गृहमंत्री शहांच्या भेटीसाठी 'वेटिंग'वर

Manipur MLA Delhi Visit: मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणत त्याठिकाणी सरकार स्थापन केले जावे, अशी मागणी घेऊन दिल्लीत आलेल्या या राज्याच्या 26 आमदारांना आठवडा उलटला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची वेळ मिळालेली नाही.

Deepak Kulkarni

New Delhi News: मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणत त्याठिकाणी सरकार स्थापन केले जावे, अशी मागणी घेऊन दिल्लीत आलेल्या या राज्याच्या 26 आमदारांना आठवडा उलटला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची वेळ मिळालेली नाही. ‘बिहारची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर या,’ असा संदेश वरिष्ठ नेत्यांमार्फत या आमदारांना पाठवण्यात आल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरचे 26 आमदार दिल्लीत तळ ठोकून आहेत.

‘‘पक्षांतर्गत कोणतेही वाद नाहीत. शिवाय राज्यातील परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणत सरकार स्थापन केले जावे,’’ अशी आमदारांची मागणी आहे. भाजपचे मणिपूर प्रभारी खासदार संबित पात्रा यांची अलीकडेच या आमदारांनी भेट घेत, त्यांचे म्हणणे मांडले होते. मात्र, अद्याप शाह आणि नड्डा यांनी संबंधित आमदारांना भेटण्यासाठी वेळ दिलेली नाही.

मैतेई आणि कुकी-नागा समाजातील हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गत फेब्रुवारी मणिपूरमध्ये (Manipur) राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर वेळोवेळी राष्ट्रपती राजवटीला सरकारने मुदतवाढ दिली होती. राज्यातील स्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पुन्हा सरकार स्थापन करण्यास हरकत नाही, असे आमदारांचे म्हणणे आहे. दिल्लीत पोहोचलेल्यांमध्ये काही वरिष्ठ आमदारांचा तसेच विधानसभेचे अध्यक्ष थोकचोम सत्यव्रत यांचा समावेश आहे.

दोन्ही समुदायांचा पाठिंबा

सरकार स्थापनेसाठीच्या प्रयत्नांना केवळ मैतेई समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचा पाठिंबा आहे असे नाही तर कुकी आणि नागा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचाही पाठिंबा आहे, असे भाजप आमदारांचे म्हणणे आहे.

शाह आणि नड्डा हे बिहार निवडणुकीत व्यग्र असल्यामुळे मणिपूरच्या या आमदारांना त्यांची वेळ मिळणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे. जर वरिष्ठ नेत्यांची भेट मिळाली नाही तर आमदारकीचा राजीनामा देऊ, असा इशारा भाजपचे आमदार टी. श्यामकुमार यांनी दिला

मे 2023 मध्ये राज्यात हिंसाचाराला प्रारंभ झाला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी या राज्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी टीकेची झोड उडवली होती. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी मागील महिन्यात मणिपूरचा दौरा केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT