Yogesh Kadam Tweet: फडणवीसांचा घायवळ प्रकरणावर मोठा खुलासा; योगेश कदमांचं काही वेळातच सूचक ट्विट; म्हणाले,'छोटी मोठी वादळं...'

Yogesh Kadam News : गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर माझ्यावर कोणीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे आरोप देखील करू शकले नाहीत. तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज डॅमेज होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत,असा आरोपही कदम यांनी केला.
fadnavis and yogesh kadam .jpg
fadnavis and yogesh kadam .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गृहराज्यमंत्री योगेश कदम हे परदेशात पळून गेलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केल्यावरुन अडचणीत सापडले आहेत. मागच्या काही दिवसांपासून घायवळ शस्त्रपरवाना प्रकरण चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. याप्रकरणी विरोधकांनी कदम यांच्यावर टीकेची झोड उठवतानाच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) याप्रकरणी पोलिसांकडून सचिन घायवळला शस्त्रपरवानाच दिला गेला नाही,असा खुलासा करत हा विषयच संपवला.आता फडणवीसांच्या भूमिकेनंतर मंत्री योगेश कदम यांनी ट्विट केलं आहे.

गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी शुक्रवारी(ता.10)आता पुन्हा एकदा विरोधकांना ट्विटद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात,राजकारणात सर्वच गोष्टींचा ‘सामना’ करावा लागतोच.पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नसल्याचंही कदम यांनी म्हटलं.

तसेच यावेळी मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी मी माझं काम,माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसंच निभावत राहणार असल्याचंही ट्विटमध्ये नमूद केलं.शेवटी असंच म्हणावं वाटतं की,छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही, असे सांगत इरादेही स्पष्ट केले आहेत.

2019 पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते,असंही मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं.

fadnavis and yogesh kadam .jpg
Ravindra Dhangekar Politics : एकनाथ शिंदेंचा प्लॅन फसला ? धंगेकरांच्या मनात नेमकं काय, महायुती की महाविकास आघाडी ?

कदम म्हणतात, पुन्हा 2024 च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज,पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खासगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला.

तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले.माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्रीपद दिले. साहजिकच,ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसं बघवणार असा टोलाही विरोधकांना लगावला.

fadnavis and yogesh kadam .jpg
Pune Police Action: मोठी बातमी: पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे गुंड निलेश घायवळ प्रकरणी 'हे' महत्त्वाचे आदेश

गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर माझ्यावर कोणीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे आरोप देखील करू शकले नाहीत. तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज डॅमेज होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत,असा आरोपही कदम यांनी केला.

दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला. व्यक्तीबद्दल मनात असलेला द्वेष काहीजणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती असंही कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

fadnavis and yogesh kadam .jpg
Devendra Fadnavis : नाशिकबाबत फडणवीसांनी टाकली 'गुगली' म्हणाले, युती केली तर युतीचे 'शंभर'

असो, राजकारणात सर्वच गोष्टींचा ‘सामना’ करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मी माझं काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसंच निभावत राहणार आहे.

सीएम फडणवीस काय म्हणाले..?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सचिन घायवळला गृहराज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी मंजूर केलेल्या शस्त्रपरवान्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, यासंदर्भात एक सुनावणी गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती.पण हा परवाना दिलाच गेला नाही.पोलीस आयुक्तांनी याबाबतची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.त्यामुळं हा परवाना दिलेला नाही.परवाना दिला असता, तर कदाचित अशाप्रकारचा आरोप योग्य होता.परंतू परवाना दिला गेलेला नाही म्हणत विरोधकांच्या आरोपातली हवाच काढून टाकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com