Manipur News : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर भाजप राज्य कार्यकारिणीने या प्रकरणी सरकारवर ठपका ठेवला आहे. मणिपूर भाजपच्या राज्य कार्यकारिणीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्य सरकार राज्यातील जातीय हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरले आहे, असा ठपका ठेवला गेला आहे. यामुळे आता हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राज्य भाजप आणि पक्षश्रेष्ठी यांच्यामध्ये वाद सुरू झाल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)
अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवलेल्या या पत्रात मणिपूर भाजपच्या प्रदेशाध्यक्षा ए. शारदा देवी यांच्यासह त्यांचे समर्थक कार्यकारिणीतील आठ नेत्यांनी राज्य सरकारवरच हा आरोप केला आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट द्यावी, अशी मागणीही या पत्रातून घेण्यात आली आहे.
पत्रात लिहिले आहे की, "राज्य स्तरावरही आमचा पक्ष म्हणून आम्ही या संकटाचा सामना करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहोत. मात्र, जनक्षोभ आणि उफाळून येणाऱ्या घटनांमुळे परिस्थिती बदलेली आहे. राज्यात दीर्घकाळ चाललेल्या अशांततेचा सगळा दोष सरकारच्या अपयशावर येतो, सरकार परिस्थिती हाताळण्यात हतबल ठरत आहे. "
दरम्यान, मणिपूर राज्यातील सध्याची अशांतता, वाढता हिंसाचाराचा प्रश्न गंभीर बनत चालले आहे. मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून हिंसाचार सुरू झाला आहे, चार महिन्यांनंतरही आता हिंसाचार थांबायचे चिन्हे दिसत नाही. यामुळे मणिपूरमधील जनजीवन विस्कळीत होऊन, सामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.