Manipur News : मणिपूर सरकारचे प्रवक्ते आणि भाजपचे आमदार सपाम रंजनसिंह यांच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील निवासस्थानाच्या परिसरात शुक्रवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी स्फोट घडवून आणला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. तर या घटनेनंतर मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी करत कारवाईचे आश्वासन दिले आहे.
मणिपूरमधील कोंथौजम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. सपाम रंजन सिंह यांच्या घराबाहेर जोरदार ग्रेनेड स्फोट झाला. ही घटना इम्फाळ वेस्ट येथील निवासस्थानाबाहेर झाली. गुरुवारी (२८ ऑगस्ट) मध्यरात्री सुमारे १:३० वाजताच्या सुमारास घराच्या मागच्या बाजूला स्फोटाचा आवाज झाला. या आवाजामुळे आसपासच्या परिसरातील लोक घाबरून घराबाहेर आले.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या स्फोटामुळे पूर्ण घर हादरल्याचे रंजनसिंह यांनी सांगितले असून, त्यांनी कोणतीही धमकी मिळाली नव्हती, असेही स्पष्टीकरण दिले आहे. तर ते घटनेच्या आदल्या दिवशीच दिल्लीहून इम्फाळला परतले होते. त्यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली होती.
त्यांनी इम्फाळला परतल्यानंतर सायंकाळी आपल्या कार्यकर्त्यांची भेट देखील घेतली होती. त्याच रात्री त्यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात भिंतींचे नुकसान झाले असून, पोलीस आणि सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसराला वेढा देण्यात आला आहे.
सध्या पोलीस तपास सुरू करत असून, मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनीदेखील शुक्रवारी दुपारी आमदारांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच घटनास्थळाची पाहणी करत हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
तसेच सुरक्षा यंत्रणांनी स्फोटाच्या परिस्थितीचा तपास सुरू केला आहे. स्फोटासाठी कोणत्या प्रकारचे स्फोटक वापरण्यात आले आणि ते नेमक्या कोणत्या परिस्थितीत घडवून आणण्यात आले, याचीही चौकशी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.