BJP MLA Threat Case : भाजप आमदाराला गोळ्या घालण्याची सुपारी देणारा आरोप म्हणतोय, ‘मी सहज बोललो...’

Sachin Kalyanshetti News : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्याच्या कथित कटप्रकरणातील संशयित श्रीशैल हुळ्ळे याला पोलिसांनी पकडले. तपासात आमदाराच्या चालकाच्या ओळखीमुळे गोळीबाराबाबत सहज बोलल्याचा दावा त्याने केला.
Sachin Kalyanshetti
Sachin Kalyanshetti Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 August : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ‘गोळी घालून मार, मी पुढचे बघतो’ असे सांगून सुपारी देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी श्रीशैल हुळ्ळे (मूळ रा. वडगाव, ता. दक्षिण सोलापूर) याला कोल्हापूर जिल्ह्यात किणीजवळ पकडण्यात आले होते. पोलिस तपासात त्याने ‘आमदाराचा गाडीचालक आपल्या ओळखीचा होता, त्यामुळे गोळ्या घालण्याबाबत आपण सहज बोललो...’ असे म्हटले आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गोळ्या घालून जीवे मारण्याची सुपारी देण्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एकाला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी फरारी होता. त्याला कोल्हापुरातून अटक करण्यात आल्यानंतर एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, पुढे वाढीव पोलिस कोठडी देण्यास न्यायालयाने नकार देत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

पोलिस कोठडीत असताना मुख्य संशयित आरोपी हुळ्ळे याची तीन अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या तीनही अधिकाऱ्यांना हुळ्ळे याच्याकडून एकच उत्तर दिले जात होते. ‘तो आनंद सुरवसे माझा ओळखीचा आहे, त्यामुळे मी सहज बोललो. चौकातील एका हॉटेलचे काम सुरू असल्याने मी त्या ठिकाणी आलो होतो,’ असे तो सांगत होता. हुळ्ळे याच्याकडे बंदूक किंवा कोणतीही संशयास्पद गोष्टी आढळून आलेल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी हे कपडे खरेदीसाठी ७ ऑगस्ट रोजी कुटुंबासह सोलापूर शहरातील महावीर चौकातील प्युमा शोरूममध्ये आले होते. कल्याणशेट्टी यांचा मोटारचालक आनंद सुरवसे (रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) हा गाडीतच बसून राहिला होता. त्यावेळी मुख्य संशयित आरोपी श्रीशैल हुळ्ळे आणि त्याचा चालक प्रभाकर फुलारी त्याठिकाणी आले होते.

Sachin Kalyanshetti
Manohar Bhosale : मनोहर भोसलेच्या पैशाची विल्हेवाट लावणे भोवले; भाजप नेत्याच्या पत्नीला अटक, भावाचीही चौकशी

हुळ्ळे आणि फुलारी यांनी आमदार कल्याणशेट्टी यांचा गाडीचालक आनंद सुरवसे याला पैशाचे आमिष दाखवत ‘तुझ्या आमदाराला गोळी घालून मार, मी पुढचे बघतो, तुला पैसे देतो,’ अशा शब्दांत सुपारी देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फुलारी यानेही, ‘साहेब काय म्हणतात ते ऐक, त्यातच तुझा फायदा आहे,’ असे म्हणून त्याला प्रात्सोहित करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, सुरवसे यांनी त्यांचे न ऐकता थेट सद बझार पोलिस ठाण्यात जाऊन हुळ्ळे आणि फुलारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला हेाता. सदर बझारचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल सावंत यांनी फुलारीला अवघ्या काही तासांतच पकडले होते. पण, मुख्य संशयित आरोपी हुळ्ळे हा पसार झाला होता.

Sachin Kalyanshetti
Barshi Politic's : तीन अपत्यांची माहिती का दिली? : बार्शीत नगरसेवकाच्या भावांकडून जीवे मारण्याची धमकी

फरारी मुख्य संशयित आरोपी श्रीशैल हुळ्ळे याला पोलिसांनी मध्यरात्री कोल्हापूरजवळ पकडले. त्याला कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी फेटाळून लावत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com