Manipur Violence, Amit Shah Sarkarnama
देश

Manipur Politics : मणिपूरमध्ये शहांकडून सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट; मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर आता कोणती खेळी?

Manipur Violence News CM Biren Singh Resignation Update Amit Shah News : एन. बीरेन सिंह यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

Rajanand More

New Delhi News : मणिपूरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून एन. बीरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याच्या काही तास आधीच त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याचदरम्यान अमित शाह यांच्या गृह खात्याकडून मणिपूरमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीरेन सिंह यांनी भाजपचे खासदार संबित पात्रा, मणिपूर सरकारमधील मंत्री आणि आमदारांसह राज्यपालांची भेट घेतली आपला पदाचा राजीनामा दिला. त्याआधी दिल्ली हे राजकीय घडामोडींचे केंद्र बनले होते. काँग्रेसकडून सोमवारी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येणार होता. यापार्श्वभूमीवर सिंह यांनी आजच शहांची भेट घेतली.

शहांसोबतच्या बैठकीत सिंह यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. सिंह यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून येऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना गृह खात्याने हायअलर्टवर ठेवले आहे. राज्यात मागील दोन वर्षांपासून सातत्याने हिंसाचार होत आहे. सिंह यांच्या राजीनाम्यामुळे वातावरण पुन्हा चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यात कुकी आणि मैतई समाजामध्ये मोठी तेढ निर्माण झाल्याने दोन वर्षांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहे. यामध्ये शेकडो लोकांचा जीव गेला आहे. हजारो लोकांना आपले घर सोडून पलायन करावे लागले आहे. जमीन, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्वावरून या दोन्ही समाजांमध्ये वाद सुरू आहे. एका समाजाकडून सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला जात आहे. या समाजातील आमदारही सरकारवर नाराज होते.

भाजपमधील 19 आमदारांनीही सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहिले होते. त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि काही मंत्र्यांचीही नावे होती. विरोधकांकडून सिंह यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात होती. त्यामुळे सिंह यांच्यावरील दबाव चांगलाच वाढला होता.

दरम्यान, राज्यात 2022 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यामुळे पुढच्या निवढणुकीसाठी जवळपास दोन-अडीच वर्षांचा कालावधी आहे. राज्यात भाजपकडे बहुमत असल्याने पक्षाकडून लवकर मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहरा शोधावा लागणार आहे. हा बदल तातडीने करावा लागणार आहे. अन्यथा हिंसाचाराच्या घटनांना पुन्हा बळ मिळण्याची भीती आहे. त्यामुळे आता भाजप कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT