Rahul Gandhi News : राहुल गांधी मल्लिकार्जून खर्गेंना तोंडघशी पाडणार? मोठी अपडेट आली समोर...

Mallikarjun Kharge comment Mahakumbh Mela Update : मल्लिकार्जून खर्गे यांनी महाकुंभ मेळ्यात राजकीय नेत्यांच्या गंगा नदीतील डुबकीवरून टीका केली होती.
Rahul Gandhi, Mallikarjun Kharge
Rahul Gandhi, Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढील एक-दोन दिवसांत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा आहे. या दौऱ्यात ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना तोंडघशी पाडू शकतात. आपल्या एक दिवसाच्या दौऱ्या राहुल यांच्याकडून महाकुंभ मेळ्यात गंगेत शाही स्नान केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अन्य काही नेतेही असू शकतात.

राहुल यांच्या प्रयागराज दौऱ्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पक्षाकडून घोषणा करण्यात आलेली नाही. महाकंभ मेळा परिसरात सेवादलाच्या शिबीराला ते उपस्थित राहू शकता. याचदरम्यान राहुल सर्वांना चकित करू शकतात. याबाबत ‘जागरण’ने वृत्त दिले आहे. मात्र, असे झाल्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे तोंडघशी पडतील, हे निश्चित.

Rahul Gandhi, Mallikarjun Kharge
Delhi CM News : दिल्लीत घडामोडींना वेग; पक्षाच्या दारुण पराभवानंतर आतिशी यांचा राजीनामा

काय म्हणाले होते खर्गे?

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना खर्गे यांनी गंगेत डुबकीवरून भाजप नेत्यांना टोला लगावला होता. गंगेत डुबकी घेऊन गरिबी दूर होते का? तुमच्या पोटाला अन्न मिळेल का?, असे सवाल खर्गे यांनी उपस्थित केले होते. त्यानंतर खर्गे यांनी लगेच माफीही मागितील होती. मला कुणाच्या आस्थेला ठेच पोहचवायची नाही. कुणाला वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो, असे ते म्हणाले होते.

काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी महाकुंभ मेळ्याचा आपला वैयक्तिक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, त्यांनी तो लगेच रद्दही केला. राय यांनी म्हटले होते की, काँग्रेसचे पदाधिकारी 10 फेब्रुवारीला महाकुंभमध्ये जाणार आहेत. चेंगराचेंगरीमध्ये बेपत्ता व जखमी भाविकांची यादी प्रशासनाकडे मागितली जाणार असल्याचे राय यांनी सांगितले होते.

Rahul Gandhi, Mallikarjun Kharge
Pramod Sawant : '2047 पर्यंत दिल्ली अन् गोव्यात सत्तेत भाजपच'; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी वर्तवलं राजकीय भविष्य!

राहुल गांधींच्या प्रस्तावित दौऱ्यामुळे राय यांनी आपला नियोजित दौरा रद्द केल्याची चर्चा आहे. राहुल यांच्या महाकुंभ दौऱ्याची पक्षाकडून तयारी सुरू असल्याचेही ‘जागरण’ने वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव अशा अनेक नेत्यांनी कुंभमेळ्यात गंगा नदीत स्नान केले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com