Parliament House sarkarnama
देश

Parliament live update : मणिपूर हिंसाचारावरून विरोधक मोदी सरकारला घेरणार ? अधिवेशन सुरू होण्यापूर्वी रणनीती..

सरकारनामा ब्यूरो

Manipur Violence : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (३१ जुलै) नववा दिवस आहे. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी संसदेत दाखल झाल्या आहेत. विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे.

शिवसेनेकडून (ठाकरे गट)अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. मणिपूर घटनेबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. मणिपूर हिंसाचारावर सभागृहात चर्चेची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. त्यामुळे आजही संसदेचे कामकाज गदारोळात होण्याची शक्यता आहे.

मणिपूरला गेलेले इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स (I.N.D.I.A.)चे खासदार काल (रविवार) दिल्लीला परतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत दिल्ली अध्यादेश विधेयक मांडू शकतात. त्याला 25 जुलै रोजी मोदी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार या विधेयकाला विरोध करत आहे. विरोधी पक्षही केजरीवाल यांच्यासोबत आहेत. केंद्र सरकारने 19 मे रोजी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अध्यादेश जारी केला होता. अध्यादेशात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा ११ मेचा निर्णय रद्द केला, ज्यामध्ये दिल्ली सरकारला बदली-पोस्टिंगचा अधिकार मिळाला होता.

दोन महिन्यापासून सुरू असलेल्या मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत दीडशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, यात 3-5 मे दरम्यान 59, 27 ते 29 मे दरम्यान 28 आणि 13 जून रोजी नऊ जणांचा समावेश आहे. 16 जुलै ते 27 जुलैपर्यंत कोणताही हिंसाचार झाला नाही, मात्र गेल्या दोन दिवसांपासून हिंसक चकमकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सरकारच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT