Manish Sisodiya Sarkarnama
देश

Manish Sisodiya: तिहार जेलमधून बाहेर पडताच 'आप'च्या सिसोदियांची पहिलं पण मोठं विधान; म्हणाले,'बाबासाहेबांच्या संविधानानं...

Political News : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिसोदिया खूपच भावूक झाले होते. यावेळी आप सरकारमधील मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

Sachin Waghmare

New Dehli News : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तिहार तुरुंगातून शुक्रवारी बाहेर आले आहेत. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सिसोदिया यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांना तुरुंगातून बाहेर सोडण्यात आले. यावेळी जेलच्या बाहेर येताच मनीष सिसोदिया म्हणाले, 'बाबासाहेबांच्या संविधानानं मला वाचवलं आहे.'

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) खूपच भावूक झाले होते. यावेळी आप सरकारमधील मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Manish Sisodiya News)

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप (AAP) नेते मनीष सिसोदिया म्हणाले, 'सकाळी जेव्हापासून हा आदेश आला, तेव्हापासून बाबासाहेबांचे ऋण कसे फेडणार हे मला समजत नाही.

सिसोदिया म्हणाले, 'मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी संविधानाच्या अधिकाराचा वापर करून हुकूमशाहीच्या तोंडावर चापट मारली. आज मी 17 महिन्यांनंतर केवळ संविधानामुळेच तुरुंगातून बाहेर आलो आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्यांना संरक्षण दिले आहे.'

तिहार जेलमधून बाहेर पडताच मनीष सिसोदिया यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आपचे नेते अरविंद केजरीवाल हे लवकरच जेल बाहेर पडतील, असा आशावाद कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात घोषणा दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT