Congress In Mahavikas Aghadi
Congress In Mahavikas AghadiSarkarnama

Congress News : काँग्रेसचा प्लॅन ठरला; विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यावर करणार लक्ष केंद्रित

Political News : विदर्भानंतर प्लॅन ठरवित आता आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
Published on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी तीन जागा जिंकत काँग्रेसने बाजी मारली. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाप्रमाणेच तीन जागा जिंकत बरोबरी साधली आहे.

या विजयामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. त्यामुळेच काँग्रेसने (Congress ) आता विदर्भानंतर प्लॅन ठरवित आता आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. (Congress News)

लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडे जाणाऱ्यांचा ओढा अधिक होता. मात्र आता लोकसभेनंतर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने चित्र पालटले आहे. 'घर फिरले की घराचे वासेही फिरतात' या म्हणीप्रमाणे आता इतर पक्षातून नेतेमंडळी महाविकास आघाडीत मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत. विशेषतः काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी अधिक ओढा आहे. त्यामुळे सध्या तरी आघाडीचा भाव चांगलाच वधारला आहे. त्यामुळे काँग्रेसने मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithla) यांच्या नेतृत्वात राज्यातील नेतेमंडळी 10 ऑगस्टपासून राज्याचा दौरा करणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भांत मिळून एकूण 10 जिल्हानिहाय बैठका घेण्याचे नियोजन असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वात स्थानिक जिल्हा पदाधिकार्‍यांसोबत या बैठका होणार आहेत. या बैठकीत विधानसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असल्याचे समजते.

Congress In Mahavikas Aghadi
Video Sambhajiraje Chhatrapati : केशवराव नाट्यगृहाच्या आगीनंतर संभाजीराजेंचा सवाल; हे आताच का घडलं? चौकशीची मागणी

या बैठकांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेसचे प्रमुख नेतेही या बैठकीत सहभागी होणार आहेत. येत्या 10 ऑगस्टला लातूर, 11 ऑगस्टला नांदेड आणि 12 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांसाठीच्या बैठका होणार आहेत.

त्यानंतर 13 ऑगस्टपासून विदर्भात दौरा करणार आहेत. बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यासाठी तर 14 ऑगस्टला अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यासाठीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीतून आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष प्लॅनिंग करण्यात येणार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळावे, या उद्देशाने सर्व पदाधिकारी व नेतेमंडळीना कानमंत्र देण्यात येणार असल्याचे समजते.

Congress In Mahavikas Aghadi
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या दोन जागांसाठी महायुतीमध्ये 'टफ फाइट'; 'या' चार दिग्गज नेत्यांच्या नावांची चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com