Mallikarjun Kharge, Sonia Gandhi Sarkarnama
देश

Manmohan Singh death : …तिथेच मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार व्हावेत! मल्लिकार्जून खर्गेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

Mallikarjun Kharge PM Narendra Modi Manmohan Singh Memorial Manmohan Singh funeral : मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  

Rajanand More

New Delhi : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. त्यांची मुलगी आज मध्यरात्री अमेरिकेतून येणार असल्याने शनिवारी मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याआधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. तसेच दोघांमध्ये फोनवरही बोलणे झाले आहे.

मनमोहन सिंग यांचे पार्थिक शनिवारी सकाळी काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर तिथूनच अंत्ययात्रेला सुरूवात होईल. याअनुषंगाने खर्गेंनी शुक्रवारी पंतप्रधानांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. खर्गेंनी पत्रातून अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा देण्याचे आवाहन केले आहे. मनमोहन सिंग यांचे स्मारक जिथे उभारता येईल, तिथेच अंत्यसंस्कार व्हावेत, असे पत्रात म्हटले आहे.

काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी सांगितले की, ‘मल्लिकार्जून खर्गे आणि मनमोहन सिंग यांचे कुटुंबीय अंत्यसंस्कार आणि स्मारकाच्या जागेसाठी सरकासोबत चर्चा करत आहेत.’ दरम्यान, मनमोहन सिंग यांच्यावर शक्तीस्थळाजवळ अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. शक्तीस्थळ हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ आहे.

काँग्रेस कार्यकारिणीची शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली. खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. या बैठकीतही अंत्यसंस्काराबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते. तसेच मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहणारा एक ठरावही पारित करण्यात आला.  

मनमोहन सिंग यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या योगदानाला पुढे नेण्याचा संकल्प कार्यकारिणी करत असल्याचे ठरावात म्हटले आहे. त्यांची मुल्य जपत आम्ही त्यांच्या संकल्पनेतील एक समृध्द आणि एकजूट भारत उभारण्याच्या दिशेने काम करण्याचा संकल्प करत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT