PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा दिल्लीसाठी ‘प्लॅन’ ठरला; रविवारी करणार शंखनाद

Delhi Assembly Election 2025 BJP Politics : दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक असून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
Narendra Modi, Delhi Assembly Election
Narendra Modi, Delhi Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्ली काबीज करण्यासाठी आतुर असलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. आम आदमी पक्षासह काँग्रेसने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असली तरी भाजपला त्याची चिंता नाही. भाजपचा निवडणुकीचा प्लॅन ठरला असून 29 डिसेंबरला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी शंखनाद करणार आहेत.

आम आदमी पक्षाने सर्व 70 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसनेही जवळपास 50 उमेदवारांची घोषणा केली आहे. पण अद्याप भाजपकडून एकही उमेदवार समोर आलेला नाही. त्यामुळे भाजपचे नेमके कसले प्लॅनिंग सुरू आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच मोदींच्या सभेची बातमी धडकली आहे. आपचा दिल्लीतील विजयरथ रोखण्यासाठी पहिला घाव मोदींकडून घातला जाणार आहे.

Narendra Modi, Delhi Assembly Election
Sonia Gandhi : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सोनिया गांधींचे 'ते' वक्तव्य पुन्हा चर्चेत; म्हणाल्या, 'मला कमीपणा...'

भाजपने 29 तारखेला दिल्लीत मोदींच्या मोठ्या सभेचे नियोजन केले आहे. या सभेतून मोदी निवडणुकीचे बिगुल फुंकतील. ही परिवर्तन सभा दिल्लीतील जपानी पार्कमध्ये होणार आहे. याबाबत ‘आज तक’ने वृत्त दिले आहे. या सभेसाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील लोकांना सभेला आणण्याचा प्रयत्न आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मोदींची ही पहिलीच सभा असेल.

दुसरीकडे आपने सर्व मतदारसंघातील उमेदवार जाहीर करत प्रचारालाही सुरूवात केली आहे. अनेक योजनाही जाहीर करण्यात आल्या असून मतदारांपर्यंत त्या पोहचवण्यासाठी जोरकस प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसनेही आप आणि भाजपविरोधात श्वेतपत्रिका जारी करत आपणही लढतीत असल्याचे दाखवून दिले आहे. आप, भाजप आणि काँग्रेस अशीच तिरंगी लढत राज्यात होणार, हे निश्चित आहे.

Narendra Modi, Delhi Assembly Election
Sonia Gandhi : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सोनिया गांधींचे 'ते' वक्तव्य पुन्हा चर्चेत; म्हणाल्या, 'मला कमीपणा...'

वेळापत्रक कधी जाहीर होणार?

दिल्लीतील विधानसभा निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार असल्याने पुढील काही दिवसांतच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नव्या वर्षाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाईल, असा अंदाज आहे. दिल्लीसह बिहारमध्येही निवडणूक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com