<div class="paragraphs"><p>Bhandarkar Oriental Research Institute Pune</p></div>

Bhandarkar Oriental Research Institute Pune

 

sarkarnama

देश

'मन की बात'मध्ये मोदींनी केलं पुण्यातील जगप्रसिद्ध संस्थेचं कौतुक

सरकारनामा ब्युरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज ‘मन की बात’ (Mann Ki Baat) मधून देशाला संबोधित केलं. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा ८४ वा होता. या वर्षांतील ही शेवटची 'मन की बात' होती. नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केली जाते. आज यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर संवाद साधला. यात मोदींनी प्रामुख्याने पुण्यातील एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्याची स्तुती केली.

वाचन संस्कृतीविषयी मोदी सविस्तर बोलले. भारतीय संस्कृती, परंपरा, सांस्कृतिक विचारधारा याबाबत त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी पुण्यातील आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राच्या कामाचं (Bhandarkar Oriental Research Institute Pune) कौतुक केलं.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रांबाबत नरेंद्र मोदी म्हणाले, ''"अलिकडेच माझं लक्ष एका लक्षवेधी प्रयत्नाकडे गेलं. आपली प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक मूल्यांना भारतातच नाही, तर जगभरात लोकप्रिय करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. पुण्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र नावाची संस्था आहे,''

''जगभरात भारतीय संस्कृती जाणून घेण्याबद्दलची उत्सुकता वाढत आहे. वेगवेगळ्या देशातील लोक फक्त आपली संस्कृतीबद्दल जाणून घेण्याबद्दलच उत्सुक नाही, तर ती वाढवण्यासाठीही मदत करत आहेत. या संस्थेनं दुसऱ्या देशातील लोकांना महाभारताच्या महत्त्वाचा परिचय करून देण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे" असे मोदी म्हणाले.

''तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल की, हा अभ्यासक्रम अलिकडेच सुरू करण्यात आला असला, तरी या अभ्यासक्रमामध्ये जे शिकवलं जातं. ती माहिती गोळा करण्याची सुरूवात 100 वर्षांआधीपासून झाली होती. जेव्हा या संस्थेनं हा अभ्यासक्रम सुरू केला, तेव्हा त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. लोकांना आपल्या परंपरांच्या विविध पैलूंना चांगल्या पद्धतीन कसं मांडलं जात आहे, हे सांगण्यासाठी मी याची चर्चा करत आहे. सातासमु्द्रापलीकडे असलेल्या लोकांना याचा लाभ कसा घेता येईल, यासाठीही विविध नवीन पद्धतीन अवलंबल्या जात आहेत,'' असे मोदींनी 'मन की बात' मध्ये म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT