मोदींच्या निर्णयाचे मुख्यमंत्री ठाकरेंनी केले स्वागत

नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे.
Narendra Modi , Uddhav Thackeray

Narendra Modi , Uddhav Thackeray

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लसीकरणासंबधी (Corona Vaccination) शनिवारी तीन मोठ्या निर्णयाची घोषणा केली. त्यात 15 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी व्हॅक्सिनेशन सुरू होणार आहे. तीन जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत टि्वट केलं आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होती,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

''१५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चित मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल,'' असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ७ डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांसाठी लसीकरण तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केली होती.

'तीन जानेवारीपासून मुलांच्या लसीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांबद्दलची चिंता पालकांची चिंता कमी होईल. हेल्थ आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचे महत्व मोठे आहे. त्यासाठी हेल्थ आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी प्रिकाॅशन डोस (बुस्टर डोस) सुरू केले जातील. हे येत्या दहा जानेवारीपासून सुरू केली जाईल. साठ वर्षांवरील इतर आजारांवरील रुग्णांसाठी (को-माॅर्डिंबिटी) त्यांच्या डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रिकाॅशन डोस देण्यात येईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

''मास्कचा भरपूर उपयोग करा. हात वारंवार धुणे हे विसरू नका. व्हायरस म्युटेड होत असला तरी आपला आत्मविश्वासही वाढत आहे. आता देशाजवळ 18 लाख आयसोलेशन बेड आहेत. 5 पाच लाख आयसोलेशन बेड, 1 लाख 40 हजार आयसीयू बेड आणि मुलांसाठी 90 हजार बेड उपलब्ध आहेत. चार लाख आॅक्सिजन सिलिंडर देशभरात दिले आहेत. बफर डोस तयार करायला राज्यांना सहकार्य करण्यात येत आहे,'' असे मोदी म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi ,&nbsp;Uddhav Thackeray</p></div>
वाजपेयींच्या ओळींतून राऊतांचा मोदींवर बाण!

आतापर्यंत 141 कोटी व्हॅक्सिन डोन देण्याचे उद्दीष्ट भारताने पूर्ण केले आहे. ही मोठी कामगिरी असल्याचे मोदी यांनी सांगितले. गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश अशा राज्यांनी सिंगल डोस हा शंभर टक्के पूर्ण केला आहे. देशात लवकरच डीएनए व्हॅक्सिनही उपलब्ध होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com