Former Army Chief Manoj Naravane Sarkarnama
देश

Manoj Naravane book : जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून संसदेत रणकंदन, आता आणखी एक पुस्तक; शशी थरूर ठरले कारणीभूत...

Shashi Tharoor inspiration, Indian Army chief book : जनरल नरवणे यांचे Four Stars of Destiny हे पुस्तक प्रचंड चर्चेत आले होते. अद्याप हे पुस्तक प्रकाशित झालेले नाही. गृह मंत्रालयाने या पुस्तकाला अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही.

Rajanand More

Indian Army updates : माजी लष्कर प्रमुख ल मनोज मुकुंद नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकावरून काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय वाद उफाळून आला होता. थेट संसदेत या पुस्तकातील मजकुराचा मुद्दा गाजला होता. प्रामुख्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अतिशय आक्रमकपणे पुस्तकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना घेरण्याचा प्रय़त्न केला होता. त्यानंतर आता जनरल नरवणे यांचे आणखी एक पुस्तक समोर आले आहे.

जनरल नरवणे यांनी आणखी पुस्तक लिहिले असून त्याचे प्रकाशनही झाले आहे. या पुस्तकाची चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र, त्यावरून सध्यातरी कोणताही वाद नाही. विशेष म्हणजे हे पुस्तक जनरल नरवणे यांनी काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांच्याकडून प्रेरणा घेत लिहिले आहे.  

पुस्तकाचे नाव द क्यूरियस अँड द क्लासिफाईड : अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज असे आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील काही रंजक व रहस्यमयी गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत. ’न्यूज १८’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार या पुस्तकाविषयी माहिती देताना जनरल नरवणे सांगतात की, काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांची प्रेरणा या पुस्तकामागे होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी थरूर यांचे एक पुस्तक मित्राच्या घरी पाहिले होते.

थरूर यांच्या A Wonderland of Words या पुस्तकातील इंग्रजी भाषेची वैशिष्ट्ये आणि रंजक गोष्टी पाहून जनरल नरवणे यांना भारतीय सैन्यदलातील कमी चर्चित आणि रंजक गोष्टींवर पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली.त्यातूनच त्यांनी पुस्तक लिहिले. लष्करातील विविध रंजक घटनांचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला होते.

‘चक दे फट्टे’हा नारा कुठून आला, सैनिकांचे कॉल साईन, विविध युध्दातील कहाण्या, सैन्यातील परंपरा आदींची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.पुस्तकात देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सत्य आहेत. नागरिक आणि सैन्यदलातील अंतर कमी करणे आणि लष्करामध्येही भावनिक, प्रेरणादायी प्रसंग आहेत, त्यांना ते कसे तोंड देतात, याची माहिती देणे हा उद्देश या पुस्तकामध्ये असल्याचे जनरल नरवणे सांगतात.

दरम्यान, जनरल नरवणे यांचे Four Stars of Destiny हे पुस्तक प्रचंड चर्चेत आले होते. अद्याप हे पुस्तक प्रकाशित झालेले नाही. गृह मंत्रालयाने या पुस्तकाला अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही. पुस्तकावरून प्रचंड वाद निर्माण झाला होता. पुस्तक प्रकाशित झालेले नसताना त्याच्या काही प्रती समोर आल्या होत्या. त्यावरून दिल्लीत गुन्हाही दाखल झाला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत या पुस्तकाची एक प्रत आणली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT