India vs Pakistan : पाकिस्तानने भारताविरोधात घेतला मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असतानाच काढला आदेश, 24 मेपर्यंत...

Pakistan Airspace Ban India: भारत आणि पाकिस्तानने पहिल्यांदाच असे निर्णय़ घेतलेले नाहीत. कारगील युध्द आणि पुलवामा हल्ल्यानंतरही हवाई क्षेत्र बंद करण्यात आली होती.
India Pakistan tensions
India Pakistan tensions Sarkarnama
Published on
Updated on

India Pakistan Tensions News: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला बुधवारी (ता. २२) एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा संघर्ष झाला होता. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकला चांगला धडा शिकविला होता. पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

वर्षभरापूर्वी दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कठोर निर्णय घेतले होते. दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांना हवाई क्षेत्र बंद केले होते. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र भारतासाठी २४ एप्रिल २०२५ पासून बंद आहे. तर भारताने ३० एप्रिल २०२५ पासून पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद केले आहे. दोन्ही देशांमधील तणाव अजूनही कमी झालेला नाही.

पहलगाम हल्ल्याला वर्ष पूर्ण होण्याआधीच पाकने भारतीय विमानांना हवाई क्षेत्र बंदीची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय विमानांना २४ मेपर्यंत पाकच्या हवाई क्षेत्राचा वापर करता येणार नाही.

पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटीस टू एअरमेन (NOTAM) मध्ये म्हटले आहे की, सर्व भारतीय नोंदणीकृत, भाडेतत्वावरील, व्यावसायिक आणि लष्करी विमांनाना २४ मे २०२६ पर्यंत सकाळी पाच वाजेपर्यंत पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी नसेल.

India Pakistan tensions
Supriya Sule Sunetra Pawar news : प्रचाराच्या सांगता सभेत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना दिला शब्द; महायुतीच्या नेत्यांसमोर म्हणाल्या, महाविकास आघाडीचा...

पाकच्या बंदीची मुदत २४ एप्रिलला संपत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकच्या बंदीमुळे भारतीय विमानांना आखाती देशांसह अन्य आंतरराष्ट्रीय शहरांकडे जाण्यासाठी लांबपल्ल्याच्या हवाई मार्गाचा वापर करावा लागत आहे. आता आणखी २४ मेपर्यंत याच मार्गांचा वापर करावा लागणार आहे. आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांचे या निर्णय़ामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

India Pakistan tensions
Tehsildar Collector controversy : जिल्हाधिकारी आणि महिला तहसीलदारामध्ये जुंपली; विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला अन् थेट कारवाई...

दुसरीकडे भारताने पाकच्या विमानांवर २४ एप्रिल सकाळी साडे पाच वाजेपर्यंत बंदी घातली आहे. ही मुदत अद्याप वाढविण्यात आलेली नाही. पाकने बंदीची मुदत वाढविल्याने आता भारताकडूनही पाकच्या विमानांना आपल्या हवाई हद्दीत प्रवेश न करू देण्याची मुदत वाढविली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानने पहिल्यांदाच असे निर्णय़ घेतलेले नाहीत. कारगील युध्द आणि पुलवामा हल्ल्यानंतरही हवाई क्षेत्र बंद करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com