Bhaiyyu Maharaj, Palak Puranik
Bhaiyyu Maharaj, Palak Puranik Sarkarnama
देश

Bhaiyyu Maharaj : मांत्रिकाशी 25 लाखांची डील, पलकच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून मोठा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

भोपाळ : दिवंगत अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पलक पुराणिकच्या (Palak Puranik) व्हॉट्सच्या चॅटमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. भोपाळमधील फॉरेन्सिक टीमने पलकचे व्हॉट्सअॅप चॅट रिकव्हर केले असून त्याचा 109 पानांचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या चॅटमध्ये पियुष जिजू या आणखी एका व्यक्तीचे नाव समोर आले असून त्याच्याशी संवाद मांत्रिकाचाही उल्लेख आला आहे.

भय्यू महाराजांनी 2018 मध्ये इंदूर येथीर राहत्या घरी आत्महत्त्या केली होती. या प्रकरणात सातत्याने नवनवे ट्विस्ट येत आहेत. महाराजांना अश्लील व्हिडीओच्या सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत पलक त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले आहे. आता यामागच्या मोठ्या षडयंत्राचा खुलासा झाला आहे. पलकला अटक केल्यानंतर तिचा मोबाईल फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आला होता.

मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट रिकव्हर करण्यात यथ मिळाले आहे. यामध्ये भय्यू महाराजांच्यासाठी बीएम हा कोड वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. पलक व पियुष जिजू या दोघांमध्ये झालेल्या संवादातून अनेक खुलासे झाले आहेत. त्यामुळे हे षडयंत्र असल्याचे स्पष्ट होत आहे. या संवादामध्ये मांत्रिकासोबत 25 लाखाचे डील झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषीला मांत्रिक सापडला असून 25 लाखांची डील झाल्याची माहिती पलककडून पियुष देण्यात आली होती. बीएमला (भय्यू महाराज) वेडा करून घरी बसवलंय, असंही पलक त्याला सांगत आहे. कुहू घरी येणार असून उद्या तिची खोली ठीक होईल, असं पियुष पलकला सांगतो. त्यावर पलक म्हणते की, कुहूने शरद सांगितले, की मी समोर आले तर मारून टाकेल. ती तयारीने आल्याचे दिसतंय. आयुषीने पुन्हा काम बिघडवलंय. तिनं पुन्हा वहिनी, कुहू आणि बापूंचे फोटो जाळ्याचे पलक पियुषला सांगत आहे.

असे काही धक्कादायक संवाद समोर आल्याने या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणात महाराजांचा सेवक विनायक व चालक शरद हा पलकला मदत करत असल्याचा आरोप आहे. भय्यू महाराज आणि आयुषी यांचा 17 एप्रिल 2017 रोजी विवाह झाला होता. आयुषीने अश्लिल व्हिडीओच्या माध्यमातून महाराजांना लग्न करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT