Maratha Reservation, Supreme Court Sarkarnama
देश

Maratha Reservation : क्युरेटिव्ह पिटीशनवरील सुनावणी पूर्ण, आता प्रतीक्षा निकालाची

Sachin Fulpagare

Maratha Reservation In Maharashtra Latest News : मराठा समाजाच्या आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटीशनवरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. फक्त मराठा समाजच नव्हे तर ओबीसींसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागून आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार आणि इतरांनी ही क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाचा निर्णयही झाला आहे. पण निर्णय अद्याप गुलदस्त्यातच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली. न्यायालयाचा निकाल आज संध्याकाळपर्यंत कळेल किंवा पुढील एक-दोन दिवसांतही येण्याची शक्यता आहे, असे वकिलांनी सांगितले.

मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटीशनवरील न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरून कळणार आहे. याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. किंवा या याचिकेतील जे पक्षकार आहेत, त्यांनाही तो ईमेलवरून निर्णय कळवला जाईल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. न्यायालयाचा हा निर्णय आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे. पण कधी-कधी एक-दोन दिवसही लागू शकतात. निर्णय झालेला आहे. तो प्रकाशित कधी होतो, त्याकडे लक्ष आहे. पण आज संध्याकाळपर्यंत निर्णय लागेल अशी अपेक्षा आहे, असे वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले.

काय असू शकतो निकाल?

पहिली बाब म्हणजे क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळली जाऊ (डिसमिस ) शकते. दुसरी म्हणजे या प्रकरणी नोटीस बजावली जाऊ शकते. आणि तिसरे पर्याय या प्रकरणी खुली सुनावणीही सर्वोच्च न्यायालय घेऊ शकते. या सुनावणीसाठी न्यायालयाकडून तारीखही दिली जाऊ शकते, असे तीन पर्याय आहेत. न्यायालयाचा निकाल एक ओळीचाच असेल म्हणजे फेटाळली गेली तर डिसमिस झाले असे असेल. दुसरा पर्याय, नोटीस असेल तर नोटीस दिली जाईल. तिसरा म्हणजे खुली सुनावणी घ्यायची असेल तर ती न्यायालयाच्या सुनावणीत घेतली जाईल. हा काही सविस्तर असा निकाल नसेल, असे ते पुढे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे क्युरेटिव्ह पिटीशनमध्ये?

मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून ओलांडून दिलेले आरक्षण वैध आहे की नाही, या मुद्द्यावर ही क्युरेटिव्ह पिटीशन आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठाने 5 मे 2021 मध्ये मराठा आरक्षण रद्दबातल केले होते. मराठा समाज मागासलेला आहे, असा आरक्षणाची शिफारस करणारा अहवाल न्या. एम. जे. गायकवाड यांनी दिला होता. हा अहवाल न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर ही क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT