Maratha Reservation : वाशिममध्ये जरांगे 'चले जाव'च्या घोषणा, ओबीसी समाजाकडून निषेध

Washim Political News : चरणगावातून परत जात असताना ताफ्याला दाखवले काळे झेंडे
Maratha REservation, OBC Reservation
Maratha REservation, OBC ReservationSarkarnama

Washim News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यभर दौरा सुरू केला आहे. अकोल्याची सभा झाल्यानंतर जरांगे पाटील हे वाशिम येथील जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी पातूरमार्गे येत असताना सकल ओबीसी समाज बांधवानी त्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी जरांगे यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. ताफा गेल्यानंतर रस्त्यावर गोमूत्र शिंपडून निषेधही व्यक्त केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषण मागे घेतल्यानंतर राज्यभर दौरा सुरू करत सभांचा धडाका सुरू केला आहे. विदर्भातही आता जरांगे पाटील यांनी सभा सुरू केल्या आहेत. मंगळवारी अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथील सभा आटोपल्यानंतर जरांगे पाटील हे वाशिमकडे रवाना झाले.

Maratha REservation, OBC Reservation
Shivsena - BJP : ...म्हणून साताऱ्यात शिवसेना- भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना आले उधाण!

जरांगे पाटील यांच्या सभांमधून ते छगन भुजबळ यांच्यावर आरोप करीत आहेत. मनोज जरांगे हे राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करीत आहेत. ते भाषणात नेहमीच ओबीसी नेते छगन भुजबळ व इतर नेत्यावर बोलतात. त्यांना दुसरे नेते दिसत नाहीत का, असा सवाल यावेळी सकल ओबीसी समाज बांधवानी केला.

यावेळी मनोज जरांगे हे पातूर-मालेगावमार्गे वाशिमकडे येत असताना सिद्धू धाब्याजवळ 'मनोज जरांगे हाय हाय, चले जाव चले जाव' अशा घोषणा देत ओबीसी समाजाने त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. आंदोलनामुळे चोख पोलिस बंदोबस्तात मनोज जरांगे यांचा ताफा वाशिमकडे रवाना झाला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपडून निषेध व्यक्त केला आहे.

((राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विदर्भातील दौऱ्याला बुलडाणा जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर खामगाव येथे जरांगे पाटील यांची सभा पार पडली. त्यानंतर आज अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे त्यांची सभा पार पडली. या सभेत अपेक्षेपेक्षा संख्या कमी असल्याची भावना सभेत उपस्थितीतानी बोलून दाखवली. वाशिम जिल्ह्यात जरांगे यांना निषेधाचा सामना करावा लागला. विदर्भात बहुतांश जिल्ह्यात कुणबी बहुल असल्यामुळे सभांमध्ये कमी प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे महासभेला संबोधित केलं. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातून मनोज जरांगे यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते, असा आयोजकांचा अंदाज होता. संभाव्य गर्दी लक्षात घेता चरणगाव परिसरातील दीडशे एकर परिसरात सभेची तयारी करण्यात आली होती. परंतु आयोजकांचे अपेक्षेप्रमाणे चरणगाव मध्ये गर्दी दिसून आली नाही.

Maratha REservation, OBC Reservation
BJP Vs Shinde Shivsena: कल्याण लोकसभेच्या जागेवरुन आमदार-खासदाराच्या वादात राजू पाटलांची एन्ट्री

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे मनोज जरांगे यांची सभा एक दिवस अगोदरच पार पडली. याशिवाय अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे मंगळवारी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला संबोधित केला. या दोन सभांचा परिणाम चरण गावातील सभेवर दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मराठा पेक्षा कुणबी समाजाचा प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. त्याचाही परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Maratha Reservation)

(Edited By Deepak Kulkarni)

Maratha REservation, OBC Reservation
Devendra Fadnavis : बीडच्या 18 लाख शेतकऱ्यांना 'पीक विमा अग्रीम' दिल्याचा फडणवीसांचा दावा, मात्र वस्तुस्थिती भलतीच!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com