Venezuelan leader Maria Corina Machado wins the 2025 Nobel Peace Prize for strengthening democracy and human rights — a major blow to Donald Trump’s Nobel hopes. Sarkarnama
देश

Nobel Peace Prize 2025 : शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर : 'आयर्न लेडी'ची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मात, मारिया मचाडो सन्मानार्थी

Nobel Peace Prize 2025 : व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. या निर्णयामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.

Hrishikesh Nalagune

Nobel Peace Prize 2025 Winner : व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलामधील नागरिकांचे हक्क, तिथली लोकशाही आणि कायद्याचे राज्य या तीन महत्वाच्या गोष्टींवर केलेल्या कामाच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएलामधील प्रमुख राजकीय नेत्या असून त्या विरोधी पक्षनेत्याही आहेत.

दरम्यान, यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्वाकांक्षेला मोठा धक्का बसला आहे. इस्त्रायल-हमास, भारत-पाकिस्तान, रशिया-युक्रेन, ही युद्धे थांबवल्याचा दावा करत ट्रम्प यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी आग्रह धरला होता. पण ज्युरींने या वर्षीचा पुरस्कार मचाडो यांना देण्याचा निर्णय घेतला.

मारिया कोरिना मचाडो यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी झाला. त्या पेशाने इंडस्ट्रियल इंजिनअर आहेत. मचाडो यांनी २००२ मध्ये अलेजांद्रो प्लाझ यांच्यासोबत सुमाते या मतदान अभ्यास आणि देखरेख गटाच्या संस्थापक म्हणून राजकारणात पाऊल ठेवले. सध्या त्या व्हेंटे व्हेनेझुएला या विरोधी राजकीय पक्षाचे नेतृत्व करतात.

व्हेनेझुएलामधील लोकशाही समर्थक चळवळीतील अग्रगण्य चेहरा म्हणून मारिया मचाडो यांची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत, त्या राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या सरकारच्या सर्वात प्रमुख टीकाकारांपैकी एक म्हणून उदयास आल्या आहेत. २०१८ मध्ये त्यांना बीबीसीने १०० प्रभावशाली महिलांमध्ये स्थान दिले होते. टाइम मासिकाने २०२५ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले.

व्हेनेझुएलाच्या सरकारने मारिया मचाडो यांच्या वाटेत अनेक अडचणी निर्माण केल्या. त्यांच्या राजकारणाल रोखण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. त्यांना देश सोडण्यास बंदी घातली. शिवाय निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. त्यानंतरही मचाडो व्हेनेझुएलातील लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी लढत राहिल्या. त्यांना संसदेतूनही निलंबित व्हावं लागलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT