Gujrat Election 2022
Gujrat Election 2022  
देश

महाराष्ट्रातील 'त्या' उद्योगांचे भाजपकडून गुजरातमध्ये मार्केटिंग...

सरकारनामा ब्युरो

Gujrat Election 2022 गुजरात निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशा गुजरातमधील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. कॉंग्रेसने (Congress) बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला असतानाच दुसरीकडे भाजपने मात्र महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचे मार्केटिंग सुरु केल्याचे दिसत आहे.

गुजरातचे भाजपचे प्रचारक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते वेदांता-फॉक्सकॉन, टाटा समूहाच्या एअरबस प्रकल्प यांमुळे राज्यात कशी रोजगारनिर्मिती होणार आहे, हे तरुणांना आणि मतदारांना पटवून देत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर भाजपने प्रचार सुरु केला आहे. पण त्या विकासात आपण वाटेकरी होऊ शकत नसल्याची नाराजी तरुणांमध्ये दिसत आहे. हाच धागा पकडच राहुल गांधी यांनी राजकोटमध्ये झालेल्या सभेत बेरोजगारी आणि बंद पडलेल्या छोट्या उद्योगांवरुन तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तर दूसरीकडे भाजपच्या याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवले आहे.

बेरोजगारी, विकासाच्या मुद्द्यावरुन माध्यमांनी राजकोटच्या युवकांशी चर्चा केली असता गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगारीच्या मुद्द्यावर नाराज असल्याचे दिसले. धक्कादायक म्हणजे राजकोटमध्ये गेल्या काही वर्षांत शासकीय नोकरभरतीही झाली नाही. राज्य सरकारने कधी नोकरीसाठी अर्ज मागविले तर कधी परीक्षाच झाली नाही. परीक्षा घेतली तर पेपर फुटले. कधी परीक्षांचे निकाल लागले तर पुढच्या मुलाखतीच झाल्या नाहीत. ज्यांच्या मुलाखती झाल्या त्यांची अद्याप नियुक्तीही करण्यात आली नाही.

काही महिन्यांपुर्वी गुजरातमध्ये तलाठ्यांच्या तीन हजार जागांसाठी तीन लाखांहून अधिक अर्ज आले होते. यावरून गुजरातमद्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या किती वाढली असल्याची आकडेवारी तरुणांची मांडली आहे. तर सौराष्ट्रच्या भागात गेल्या पाच वर्षांत कोणताही मोठा उद्योग उभारण्यात आलेला नाही. किमान त्यावर तरी भाजपने लक्ष देणे गरजेये होते, अशी अपेक्षा या तरुणांकडून होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT