Uddhav Thackeray : ‘कामाख्या देवी कोपली तर तुमची खैर नाही " ; खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच !

Uddhav Thackeray : 'कामाख्या देवी खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही,' असा टोला ठाकरेंनी शिंदे गटाला हाणला आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी गुवाहाटीहून कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परत आले आहेत. "महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी," असा नवस मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यावर आज (सोमवारी) शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून टीकेचे बाण सोडले आहेत. (Uddhav Thackeray latest news)

"हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच," असे ताशेरेही अग्रलेखात ओढले आहे. 'कामाख्या देवी खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही,' असा टोला ठाकरेंनी शिंदे गटाला हाणला आहे.

"महाराष्ट्रात अनेक प्रश्नांचे थैमान सुरू आहे. राज्य आर्थिक डबघाईला आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर व सांगलीतील ‘जत’वर दावा सांगून खळबळ उडवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर घाणेरडय़ा पद्धतीने चिखलफेक सुरू असल्याने राज्याची जनता संतप्त आहे. असे सगळे घडत असताना राज्याचे मिंधे मुख्यमंत्री त्यांच्या गटाच्या तीसेक आमदारांसह गुवाहाटी येथील कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी गेले. मुंबईतून विमाने भरभरून माणसे नेली व तेथे नवस फेडले. पण दुसऱया दिवशी परत मुंबईकडे येताना त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव आणि चिंता स्पष्ट दिसत होती," असे अग्रलेखात नमूद केले आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Karnataka Border Dispute : सीमावाद पुन्हा चिघळला ; अथणी-पुणे बसवर दगडफेक

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात..

  • कामाख्या देवीच्या मंदिरात ‘बळी’ प्रथा आहे व लहान रेड्यांचा बळी दिला जातो. (खरे खोटे 40 खोके आमदारांनाच माहीत) महाराष्ट्रात अनेक स्थानांवर कोंबडी, बकऱयांचा बळी दिला जातो व त्या अंधश्रद्धेस सगळय़ांचा विरोध आहे, पण शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्रात सत्ता यावी म्हणून फुटीर गटाने असे बळी गुवाहाटीस जाऊन दिले हे खरे असेल तर महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेस ते शोभणारे नाही.

  • आषाढी-कार्तिकेस पांडुरंगाची महापूजा घातली जातेच व तेव्हा देवाला साकडे घातले जाते. कामाख्या देवीची पूजा ही वैयक्तिक असू शकेल. मिंधे गटाचे एक आमदार योगेश कदम देवीचे नाव घेऊन धमकी देतात की, ‘कामाख्या देवी कोपली तर तुमची खैर नाही. कोप होईल कोप.’ अर्थात हे सर्व मिंधे गटानेच लक्षात घ्यायचे आहे.

  • कामाख्या देवीस न्याय देवता असेही म्हटले जाते. ‘बळी’ची लाच दिली म्हणून ती खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही. कोणतीही देवी किंवा देव गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत नाही. त्यामुळे कोप झालाच तर तो मिंधे गटाच्या आमदारांवर होईल. म्हणून धावत पळत हे लोक देवीच्या चरणाशी पोहोचले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com