Mayawati Big Decision Sarkarnama
देश

Mayawati News : मायावतींची राजकीय कोंडी? ज्याला हाकलले, त्याच्याच ताब्यात दिला पक्ष...

Mayawati's Strategic Move in BSP Leadership : मायावती यांनी आपले भाचे आकाश आनंद यांना पुन्हा एकदा पक्षात मानाचे स्थान दिले आहे. रविवारी पक्षाची महत्वपूर्ण बैठक झाली.

Rajanand More

Who is Akash Anand? Rising Face of BSP : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची मागील काही वर्षांतील राजकीय वाटचाल बिकट बनली आहे. सर्वाधिक ताकद असलेल्या उत्तर प्रदेशातही त्यांच्या पक्षाची वाताहात झाली आहे. त्यातच आता पक्षाच्या नेतृत्वावरूनही गोंधलाची स्थिती निर्माण झाली आहे. आपल्या भाच्यासमोर त्यांनी एकप्रकारे राजकीय शरणागती तर पत्करली नाही ना, अशीच चर्चाच राजकीय वर्तूळात पुन्हा झडू लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे.

मायावती यांनी आपले भाचे आकाश आनंद यांना पुन्हा एकदा पक्षात मानाचे स्थान दिले आहे. रविवारी पक्षाची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत आकाश यांना पक्षाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक हे पद देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्यासोबत तीन राष्ट्रीय समन्वयकही असतील. आजच्या बैठकीत आकाश हे सतत मायावती यांच्यासोबत दिसत होते.

आगामी निवडणुकीत आकाश यांच्यावरह प्रचाराची धुरा असण्याची शक्यता आहे. त्यांच्या मदतीला सध्या खासदार रामजी गौतम, रणधीर बेनीवाल आणि राजाराम यांना राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच मायावती यांनी आकाश आनंद आणि त्यांचे सासरे अशोक सिध्दार्थ यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

आकाश आनंद यांनी 13 एप्रिलला एक्सवर पोस्ट करत मायावती यांची माफी मागितली होती. कोणतेही नातेवाईक किंवा सल्लागारांचा राजकीय सल्ला यापुढे घेणार नसल्याचे शपथही त्यांनी घेतली. मायावती याच आपल्या एकमेव राजकीय गुरू असतील, असेही त्यांनी म्हटले होते. सर्व चुका पदरात घेऊन माफ करण्याची विनंती आकाश यांनी केली होती.

आकाश आनंद यांच्या या विनंतीनंतर मायावती यांनीही त्यांना पुन्हा पक्षात घेण्याची घोषणा केली. आकाश यांनी सार्वजनिकपणे मागितलेली माफी, वरिष्ठांचा सन्मान करण्याचे आश्वासन, सासऱ्यांचे न ऐकण्याचे वचन आणि पक्षासाठी समर्पित भावाने काम करण्याची हमी दिल्याचे मायावती यांनी म्हटले होते. मात्र, यापुढे कुणालाही आपला उत्तराधिकारी बनविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, आकाश आनंद हे मागील काही वर्षांपासून पक्षात सक्रीय आहे. ते युवा असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे आकर्षण आहे. त्यांची आक्रमक भाषणेही युवकांना आकर्षित करतात. मात्र, काहीवेळा ते या भाषणांमुळे अडचणीतही आले आहेत. असे असले तरी आता त्यांना पुन्हा पक्षात संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता आहे. आकाश आनंद हे मायावती यांच्यासाठी अपरिहार्य पर्याच होते, अशीची चर्चा आहे. त्यामुळे कितीही चुका केल्या तरी आकाश यांच्या चुका मायावतींनी पदरात घेतल्या. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT