Rahul Gandhi News: परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा 'तो' व्हिडिओ; राहुल गांधींनी 'ऑपरेशन सिंदूर'वरुन मोदी सरकारला घेरलं..

Operation Sindoor : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (ता.17) सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचा व्हिडिओही शेअर केला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व विरोधी पक्षांची बैठक घेत त्यांना परिस्थितीची माहिती दिली होती.तसेच विरोधकांना विश्वासात घेऊनच दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात पावले उचलली जात असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. याचवेळी विरोधी पक्षांनीही आपण दहशतवादाविरोधातील प्रत्येक कारवाईत सरकारसोबत असल्याचंही लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्पष्ट केलं होतं. पण आता त्यांनीच परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत सरकारला ऑपरेशन सिंदूरबाबत काही सवाल केले आहेत.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (ता.17) सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचा व्हिडिओही शेअर केला आहे. याच व्हिडिओचा दाखला देत त्यांनी मोदी सरकारची ऑपरेशन सिंदूरवरुन (Operation Sindoor) प्रश्नांची सरबत्ती करत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपनं देशभरात वेगवेगळ्या माध्यमातून या पाकिस्तानवरील कारवाईचं श्रेय घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तसेच भाजप नेत्यांची गेल्या काही दिवसांतील एकापाठोपाठच्या ऑपरेशन सिंदूरवरील विधानांनी विरोधकांच्या आरोपांना आणखीच हवा मिळाली. पण आता यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी मैदानात उतरले आहे.

Rahul Gandhi
Navneet Rana News: लोकसभेचा वचपा काढण्यासाठी नवनीत राणांची मोठी घोषणा; मित्रपक्षांची धडधड वाढवली

ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान किती विमाने गमावली गेली असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे. परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांच्या व्हिडिओमधील विधानाचा संदर्भ देत त्यांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी हल्ल्यापूर्वी सरकारने पाकिस्तानला का कळवले? यामुळे आपण किती लढाऊ विमाने गमावली असा खडा सवालही त्यांनी केला आहे.

राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणतात,आमच्या हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा होता. परराष्ट्रमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या कबूल केले आहे की, भारत सरकारने हे केले.हे कोणी अधिकृत केले? यामुळे आपल्या हवाई दलाने किती विमाने गमावली? असंही लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

Rahul Gandhi
Pune News : वसंत मोरेंना कात्रज चौकातच थांबवणार! एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन

जयशंकर व्हिडिओत काय म्हणतात?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्हिडिओत ते म्हणतात,"ऑपरेशनच्या सुरुवातीला आम्ही पाकिस्तानला संदेश पाठवला की, आम्ही दहशतवादी तळांवर हल्ला करत आहोत.आम्ही लष्करावर हल्ला करत नाही आहोत.लष्कराने यात भाग घेऊ नये.त्यांनी या चांगल्या सल्ल्याचे पालन केले नसल्याचं एस.जयशंकर म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com