Bahujan Samaj Party update : बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पुतण्या आकाश आनंद यांच्यानंतर आता मायावती यांनी आपले बंधू आनंद कुमार यांनाही नॅशनल कोऑर्डिनेटर पदावरून हटवलं. त्यांच्या जागी रणधीर सिंह बेनीवाल यांना राष्ट्रीय समन्वय पदाची जबाबदारी दिली आहे. अवघ्या 48 तासांमध्ये मायावती यांनी यू-टर्न घेत हा मोठा निर्णय घेतला आहे.
तर आनंद कुमार हे आधीप्रमाणेच बसपच्या(BSP) राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर राहून थेट मायावती यांच्या निर्देशानुसार आपली जबाबदारी निभावत राहतील. अशाप्रकारे मायावती यांच्याकडून पुन्हा एकदा मोठा संघटनात्मक बदल करण्यात आला आहे.
आनंद कुमार यांच्या जागी सहारनपूरचे रहिवासी असलेल्या रणधीर बेनीवाल यांना मायावती यांनी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय समन्वय बनवलं आहे. त्यांच्यासोबतच रामजी गौतम यांनाही या पदाची जबाबदारी सोपवली आहे.
मायावती(Mayawati) यांनी सोशल मीडिया साइट एक्सवर पोस्ट करत माहिती दिली की, आनंद कुमार यांनी पक्ष आणि संघटनेच्या हिताच्या दृष्टीने एका पदावर कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जी मान्य केली गेली. आता ते पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहून माझ्या निर्देशानुसार काम करतील.
तसेच त्यांनी म्हटले की, याचबरोबर सहारनपूरचे रहिवासी असलेले रणधीर बेनीवाल आणि बसपचे राज्यसभा खासदार रामजी गौतम हे दोघेही राष्ट्रीय समन्वय पदावर राहून त्यांच्या निर्देशानुसार विविध राज्यांची जबाबदारी सांभाळतील.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.