Sanjay Raut - Varun gandhi  Sarkarnama
देश

उत्तर-प्रदेशमध्ये शिवसेनेचे बस्तान बसणार? संजय राऊत-वरुण गांधींची 'डिनर डिप्लोमसी'

Uttar Pradesh Politics | Shivsena | Sanjay Raut | Varun Gadhi : भाजपवर नाराज वरुण गांधींची संजय राऊतांसोबत ३ तास खलबत

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : भाजपचे नाराज खासदार वरुण गांधी (Varun gandhi) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची काल (मंगळवार) रात्री दिल्लीतील निवासस्थानी भेट झाली. राऊत यांनी गांधी यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली असून देशाच्या राजकारणात आणि प्रामुख्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात काही नवीन समीकरण उदयास येणार का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

वरुण गांधी आणि मनेका गांधी या भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेते मानले जातात. मनेका गांधी या पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळातील मंत्रिमडंळात मंत्री देखील होत्या. दरम्यान २०१९ च्या निवडणुकीनंतर मात्र वरुण गांधी यांनी काही स्वत:ला भाजपपासून अलिप्त ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपवर ते नाराज असल्याचीही चर्चा आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपचं नाव काढले आहे. याशिवाय शेतकरी आंदोलन आणि लखीमपूर खीरी सारख्या घटनांवरुन त्यांनी भाजपवरच टीका केली होती. त्यामुळे वरुण गांधी नजीकच्या काळात भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोलले जात आहे.

दुसऱ्या बाजूला शिवसेना-भाजपचे वैर आता सर्वश्रृत झाले आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सोबतच शिवसेना देशभरात विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे. यातूनच गोवा, बिहार, गुजरात, उत्तरप्रदेश अशा ठिकाणी शिवसेना निवडणूक लढवत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या हाताला यश लागले नाही. अनेक ठिकाणी शिवसेनेचे डिपॉझिट देखील जप्त झाले होते. त्यामुळे आता राऊत-गांधी भेटीनंतर काही नवीन समीकरण समोर येवून शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये आपले बस्तान बसवणार का? असा सवाल विचारला जात आहे.

मात्र या भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, बरेच दिवस भेटीची वेळ पुढे मागे होत होती. मंगळवारी आमची भेट झाली. आता जरी ते खासदार असतील, कोण्या राजकीय पक्षाशी आणि गांधी कुटुंबाशी संबंधित असतील तरी माझी आणि त्यांची भेट सदिच्छा भेट होती. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. वरुण गांधी उत्तम लेखक आहेत. अनेक विषयांवर ते चांगल्या गप्पा मारतात, राजकीय विषयावर चर्चा करत असतात. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये त्यांनी चांगली भूमिका घेतली होती. परंतु माझी आणि वरुण गांधी यांची भेट सदिच्छा भेट होती. तसेच यापुढेसुद्धा आम्ही भेटत राहू असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT