Meghalaya- Nagaland Oath Ceremony Sarkarnama
देश

Meghalaya-Nagaland Oath Ceremony: मेघालय आणि नागालॅंडच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी… पंतप्रधान राहणार उपस्थित

उत्तर-पूर्व राज्य, नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाला.

सरकारनामा ब्युरो

Meghalaya-Nagaland Elections: उत्तर-पूर्व राज्य, नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाला. त्यानंतर आज (७ मार्च) मेघालय आणि नागलॅंड या दोन राज्यात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याळ पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मेघालय आणि नागालँड या दोन राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज तर त्रिपुरातील सरकारचा शपथविधी सोहळ उद्या म्हणजेच ८ मार्चला होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते ईशान्य राज्यांमधील शपथविधी -समारंभात पंतप्रधानांसोबत सहभागी होऊ शकतात. नुकत्याच झालेल्या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नागालँड आणि त्रिपुरामध्ये एनडीपीपीच्या मदतीने भाजपाने स्वतःच सत्ता कायम ठेवली. कोनराड संगमा यांच्या नेतृत्वातील नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) या राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतर भाजप मेघालयातील सरकारचा भाग होण्यासाठी तयार झाली आहे.

नागालॅंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ मार्चला नागालँडमधील एनडीपीपी-बीजेपी सरकारच्या शपथविधी समारंभात उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) आणि भाजपा 27 फेब्रुवारी रोजी 60 -सदस्यांच्या राज्य विधानसभेसाठी 40:20 या फॉर्म्युलाच्या तत्त्वावर युती केली आहे. विशेष म्हणजे एनडीपीपीने आपला सलग दुसरा कार्यकाळ सत्ता राखत अनुक्रमे 25 आणि 12 मतदारसंघ जिंकले आहेत.

मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे सरकार स्थापनेची घोषणा केलेली नाही. मात्र एनडीपीपीचे मुख्य प्रमुख नेफ्यु रिओ हेच मुख्यमंत्री राहतील, असे भाजपाने यापूर्वीच जाहीर केले आहे.

मेघालय

मेघालयाचे माजी उप -उपमुख्यमंत्री आणि एनपीपी नेते प्रेस्टोन टाईनसॉग्न म्हणाले की, नवीन सरकारचा शपथविधी सोहळा ७ मार्च रोजी होईल आणि पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

एनपीपी मेघालयातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ठरला आहे. 27 फेब्रुवारीला 59 पैकी 26 जागा जिंकत एनपीपीने सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु मतमोजणी दरम्यान 31 जागांच्या बहुमताचा आकडा गाठण्यात एनपीपी अपयशी ठरला. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी मेघालयातील युतीसाठी कोनराड संगमाशी संवाद साधल्यानंतर ट्विटरद्वारे एनपीपीशी झालेला करार जाहीर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT