Nashik Politics: गिरीश महाजन यांची काँग्रेस-भाजप सलोखा एक्सप्रेस!

BJP - Congress: ग्रामविकास मंत्र्यांची काँग्रेसच्या आमदारांच्या विकासकामांना केले साह्य.
Girish Mahajan & Hiraman Khoskar
Girish Mahajan & Hiraman KhoskarSarkarnama

नाशिक : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आमदार कॉंग्रेसचे (Congress) आमदार हिरामन खोसकर (Hiraman Khoskar) यांच्या मतदारसंघात पाच कोटींची रद्द केलेली कामे पुन्हा मंजूर केली आहेत. यामुळे कॉंग्रेसच्या आमदारावर भाजपचे (BJP) मंत्री गिरीश महाजन यांनी केलेली मेहेरनजर चर्चेचा विषय झाला आहे. यानिमित्ताने काँग्रेस-भाजप सलोख्याचे हे पर्व टोकदार राजकीय संघर्षात हळुवार फुंकर ठरली आहे. (Congress-BJP new cooperation in Nashik politics is in discussion)

Girish Mahajan & Hiraman Khoskar
Shivsena News; दादा भुसेंच्या मतदारसंघात परिवर्तन होईल?

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मूलभूत सुविधांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदारांना मंजूर केलेल्या सर्व कामांना ऑक्टोबर २०२२ मध्ये स्थगिती दिली होती. यामध्ये कॉंग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांच्या मतदारसंघासाठी मंजूर केलेल्या पाच कोटींच्या निधीतील कामेही रद्द झाली होती. मात्र, त्यांची स्थगिती उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य आमदारांवर मात्र ही मेहेरनजर झालेली नाही.

Girish Mahajan & Hiraman Khoskar
Vasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यात एकच खळबळ

महाविकास आघाडीचे सरकार असताना ग्रामविकास मंत्र्यांनी केवळ कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला, असा आरोप करीत शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यात भाजपच्या सोबतीने नवीन सरकार आले.

मुख्यमंत्री कोणाचा या मुद्यावरून शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. या सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी भाजपच्या आमदारांना निधी दिला नाही, अशा तक्रारी केल्या जात होत्या.

त्यानंतर सत्तेतील सहभागी शिवसेनेच्याही आमदारांना निधी दिला जात नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्या व अखेर याच कारणाचा हवाला देत शिवसेनेत बंडखोरी होत महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर सत्तेत आलेल्या नवीन सरकारने एप्रिल २०२१ नंतर मंजूर केलेली व कार्यारंभ आदेश देऊनही सुरू न झालेली सर्व कामे रद्द करण्याचा निर्णय १९ जुलै २०२२ रोजी घेतला.

Girish Mahajan & Hiraman Khoskar
Shivsena : शिवगर्जनेत उपराजधानीकडे ठाकरेंचे दुर्लक्ष, पण ‘शिवधनुष्य’साठी शिंदे येणार !

ऑक्टोबरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी २५१५ या लेखाशीर्षाखालील कार्यारंभ आदेश देऊनही सुरू न झालेली सर्व कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर, पेठ-दिंडोरी व नाशिकरोड-देवळाली या मतदारंसघातील अशी कामे रद्द झाली होती. यात सर्वाधिक पाच कोटींची कामे आमदार हिरामन खोसकर यांची होती.

आमदार खोसकर यांनी मंजूर करून आणलेल्या या पाच कोटींच्या कामांचे नाशिक जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीने १४ जुलै २०२२ रोजी वाटप केले व १९ जुलै रोजी सरकारने कामांना स्थगिती देण्याता आली. दरम्यान या काळात आमदार हिरामन खोसकर व बांधकाम विभाग यांनी मागील तारखेत कार्यारंभ आदेश मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ती काम वाटप समितीच्या काम वाटपाला स्थगिती देऊन चौकशी सुरू केली होती. यामुळे हा प्रयत्न अपयशी ठरला होता.

Girish Mahajan & Hiraman Khoskar
CM Eknath Shinde : नातवाने हट्ट केला.. मग काय आजोबा मुख्यमंत्री निघाले हट्ट पूर्ण करायला

काम वाटप उशिरा केल्याचा ठपका ठेवून आमदार हिरामन खोसकर यांनी जिल्हा परिषदेच्या व बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या कारभाराबाबत आरोप केले होते. त्यामुळे कार्यकारी अभियंता यांनी बदली करून घेतली. दरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विभागाने १७ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित करून आमदार हिरामन खोसकर यांच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघातील २५१५ लेखाशीर्षाखाली मंजूर केलेली कामे १२ ऑक्टोबरच्या रद्द केलेल्या कामांच्या यादीतून वगळण्यात आल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ही कामे मार्गी लागली आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत आहे.

ठराविक आमदारांनाच सूट का?

दरम्यान आर्थिक वर्ष संपत आले असताना काही मंत्रालायांनी या रद्द केलेल्या कामांच्या निधीतून नवीन कामे मंजूर करण्याची भूमिका घेतली. मात्र, ग्रामविकास मंत्रालयाने रद्द केलेली कामे त्या यादीतून वगळण्याची भूमिका ठराविक मतदारसंघांसाठीच घेतली असल्याचे दिसत आहे. यामुळे ग्रामविकास मंत्री व त्यांच्या मंत्रालयाकडून केली जाणारी मेहेरनजर ठराविक व्यक्तिंसाठीच का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com