BJP Meghalaya Assembly Election 2023 sarkarnama
देश

Meghalaya Assembly Election 2023 : युवक, महिलांच्या हाती मेघालयाचं राजकीय भवितव्य ; BJP कडून उमेदवार जाहीर

BJP Meghalaya Assembly Election : . येत्या ११ फेब्रुवारी रोजी मेघालयात मोदींच्या दौऱ्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची शक्यता भाजपच्या सुत्रांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Assembly Election 2023 : मेघालय विधानसभा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मेघालय विधानसभेची निवडणूक (Meghalaya Assembly Election 2023) होत आहे.

यासाठी भारतीय जनता पक्षाने ६० जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीत या ६० नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मोदी ११ फेब्रुवारी रोजी मेघालयात

मेघालय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक काळात मेघालयामध्ये मोदींच्या सभा, रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ११ फेब्रुवारी रोजी मेघालयात मोदींच्या दौऱ्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची शक्यता भाजपच्या सुत्रांनी व्यक्त केली आहे.

मेघालय विधानसभेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने सर्वच आघाड्यावर जोर लावला आहे. सध्या मेघालय विधानसभेत भाजपचे दोनच आमदार आहेत. येथे विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. यासाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून ३ मार्च रोजी निकाल आहे.

या निवडणुकीत ८१ हजारांपेक्षा अधिक मतदार हे १९ वर्षांचे आहेत. ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाने केवळ दोन जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि एनपीपीने युती करून राज्यात सरकार स्थापन केलं होते. स्थानिक राजकीय पक्षांचं वर्चस्व मेघालयमध्ये आहे. तरीही भाजपने कुठल्याही पक्षाची युती न करता निवडणुकीत ‘एकला चलो’चा नारा दिला आहे.

निवडणुकीत भाजपाने ४७ जागांवर निवडणूक लढवली होती. यातील केवळ दोनच जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. तर एनपीपीला २० जागा मिळाल्या होत्या. निवडणूक निकालानंतर भाजपाने एपीपीशी युती केली. कोनराड संगमा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT