Meghalaya Plans Law to Make HIV Test Mandatory Before Marriage Sarkarnama
देश

Meghalaya News: लग्नापूर्वी HIV चाचणी बंधनकारक? सरकार आणणार लवकरच कायदा

Meghalaya HIV law HIV Test Before Marriage : मेघालयात पश्चिम आणि पूर्वे कडील भागात एचआयव्ही/एड्सचे सर्वाधिक रुग्ण जैंतिया हिल्स भागात आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री अंबरीन लिंगदोह यांनी शुक्रवारी दिली.

Mangesh Mahale

📝 3 Point Summary

  1. मेघालय सरकारचा पुढाकार: एचआयव्ही/एड्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मेघालय सरकार लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करणारा कायदा आणण्याचा विचार करत आहे.

  2. आकडेवारी आणि चिंतेचा विषय: पूर्व खासी हिल्समध्ये ३,४३२ रुग्ण आढळले असून केवळ १,५८१ जणांवर उपचार सुरू आहेत; एआरटी अभावी १५९ जणांचा मृत्यू झाला.

  3. जनजागृतीपेक्षा तपासणीचे आव्हान: आरोग्यमंत्री अंबरीन लिंगदोह यांनी सांगितले की आता जनजागृती कमी समस्या आहे, पण चाचणी आणि उपचार केंद्रांचा अभाव अधिक मोठे आव्हान आहे.

राज्यातील एचआयव्ही आणि एड्सच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मेघालय सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यात लग्नापूर्वी एचआयव्ही/एड्स चाचणी अनिवार्य करण्यासाठी नवा कायदा करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री अंबरीन लिंगदोह यांनी शुक्रवारी दिली.

उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आरोग्यमंत्री अंबरीन लिंगदोह उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. समाजकल्याण मंत्री पॉल लिंगडोह आणि पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील आठ आमदारही या बैठकीला उपस्थित होते.

वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त करताना अंबरीन लिंगदोह म्हणाले की, एकट्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यामध्ये एचआयव्ही/एड्सचे 3,432 रुग्ण आढळले असून त्यापैकी केवळ 1,581 रुग्ण उपचार घेत आहेत. एचआयव्ही/एड्सची चाचणी गोव्यात बंधनकारण आहे तर मेघालयात स्वत:चे वेगळे कायदे का नसावेत? या कायद्यामुळे समाजातील अनेकांना फायदा होईल, असे लिंगदोह म्हणाले.

मेघालयात पश्चिम आणि पूर्वे कडील भागात सर्वाधिक रुग्ण जैंतिया हिल्स भागात एचआयव्ही/एड्सचे रुग्ण अधिक आहेत. ईस्ट खासी हिल्समध्येही या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. एचआयव्ही/एड्सच्या प्रादुर्भावाच्या बाबतीत मेघालय राष्ट्रीय स्तरावर सहाव्या क्रमांकावर आहे.

जनजागृती ही आता मोठी समस्या राहिलेली नाही, तर चाचणी आणि स्क्रीनिंग सुधारण्याचे खरे आव्हान असल्याचे आरोग्यमंत्री लिंगदोह यांनी सांगितले. अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) अभावी जिल्ह्यात १५९ जणांचा मृत्यू झाला आहे.एचआयव्ही/एड्सवर योग्य उपचार केल्यास तो कर्करोग किंवा टीबीइतका घातक नाही, असे ते म्हणाले.

4 सामान्य प्रश्न व उत्तरे (FAQs)

  1. मेघालय सरकार काय नविन निर्णय घेणार आहे?
    लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा कायदा तयार करत आहे.

  2. पूर्व खासी हिल्समध्ये किती एचआयव्ही रुग्ण आहेत?
    एकूण ३,४३२ पैकी फक्त १,५८१ रुग्ण उपचार घेत आहेत.

  3. राज्यात एचआयव्हीमुळे मृत्यू का होत आहेत?
    अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) न मिळाल्याने १५९ मृत्यू झाले.

  4. एचआयव्हीवर उपचार केल्यास काय परिणाम होतो?
    योग्य उपचार घेतल्यास एचआयव्ही टीबी किंवा कर्करोगासारखा घातक राहात नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT