Meghna Bordikar: काय सांगता? दारु विक्री करणाऱ्या ट्रकवर भाजपच्या राज्यमंत्र्याचं नाव!

Liquor seized from truck linked to BJP MLA Meghna Bordikar: मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या भाजप आमदार आणि राज्यमंत्री आहेत.त्यांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची अवैध विक्री करण्यात येत असल्याचे आढळले आहे.
Liquor seized from truck linked to BJP MLA Meghna Bordikar
Liquor seized from truck linked to BJP MLA Meghna BordikarSarkarnama
Published on
Updated on

Meghana Bordikar: हडपसर येथून नागपुरकडे निघालेल्या दारु विक्री करणाऱ्या एका अवैध ट्रकवर राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे-बोर्डिकर असं नाव ठळक अक्षरात लिहिण्यात आले आहे. हा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. ट्रकवर भाजप आमदार आणि राज्यमंत्र्याचं नाव असल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या भाजप आमदार आणि राज्यमंत्री आहेत.त्यांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची अवैध विक्री करण्यात येत असल्याचे आढळले आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. पुसद पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

40 लाख 23 हजार रुपयांची दारू, ट्रक, सात मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण 64 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल पुसद पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेला ट्रक हा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या चुलतभावाच्या मालकीचा असल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांना आढळले आहे.

मनीष ईश्वरू सुरुळे (१९, रा. वाडी नामदार, ता. पैठण, जिल्हा संभाजीनगर, हल्ली मुक्काम कारेगाव, पुणे), राजेश्वर मधुकर पवार (२३), सचिन उद्दल चव्हाण (२३), सचिन सावन चव्हाण (२४), गोकुळ बाबूसिंग चव्हाण (२३), विक्रम बळीराम जाधव (२०) सर्व रा. तुळशीनगर ता. महागाव आणि प्रवीण दत्ताजी जोहरे (३०), रा. वाई गौळ, ता. मानोरा, जि. वाशीम यांना पुसद पोलिसांना ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

Liquor seized from truck linked to BJP MLA Meghna Bordikar
Maharashtra Politics: वांद्रे येथील पीव्हीआर, सिनेमागृहात शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन

नेमकं काय घडलं?

  1. विश्वास इंटरप्राइजेस आणि ट्रान्सपोर्टच्या (पुणे) मालकीचा ट्रक (एमएच १२, वायबी ००४८) हा हडपसरमधून (पुणे) ४० लाख रुपये किमतीची ‘ग्रीन लेबल’ ही दारू घेऊन नागपूरकडे जात होता.

  2. एनडीजे लिक्विड्स प्रायव्हेट लिमिटेड येथे ही दारू पोहचवायची होती. ट्रकचालक नागपूरकडे न जाता पुसद शहरात पोहोचला.

  3. माहूर मार्गावर मोकळया जागी ट्रक उभा करून दारू विक्री करू लागला. तीन दुचाकींवरून आलेल्या सहा तरुणांनी सहा पेट्या दारू खरेदी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com