Bill Gates
Bill Gates Sarkarnama
देश

कोरोनानंतर आणखी एक महामारी जगाचा दरवाजा ठोठावणार! बिल गेट्स यांचा इशारा

सरकारनामा ब्युरो

म्युनिक : कोरोना (Covid-19) महामारीमुळे जगाला अतिशय मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. यातून जग अद्याप सावरलेले नसताना आणखी एक महामारी दरवाजा ठोठावणार आहे. मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. आणखी एक महामारी आता जवळ आली आहे, असे भाकित त्यांनी वर्तविले आहे. त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

बिल गेट्स यांनी याआधी कोरोना विषाणूचा प्रकार असलेल्या ओमिक्रॉन संसर्गावेळी धोक्याचा इशारा दिला होता. ओमिक्रॉन हा जगभरात सगळीकडे पसरेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यांचा इशारा नंतर खरा ठरला होता. आता त्यांनी जगाला नव्या महामारीचा धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भविष्यात येणारी ही महामारी कोरोना विषाणूमुळे येणार नसून एका वेगळ्या संसर्गामुळे होईल. कोरोनावरील लस अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे आता कोरोनापासून गंभीर संसर्ग होण्याचा धोका आता अतिश कमी झाला आहे.

आपल्याला आणखी एका साथीच्या रोगाला तोंड द्याव लागणार आहे. पुढील वेळी रोगास कारणीभूत ठरणारा घटक वेगळा असणार आहे. प्रामुख्याने वृद्ध, लठ्ठपणा किंवा मधुमेह असणाऱ्यांना गंभीर रोगाचा धोका हा असतो. आता कोरोनाबाबतचा हा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. चालू वर्षाच्या मध्यापर्यंत जगातील 70 टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) उद्दिष्ट आहे. हा खरे तर खूप उशीर ठरेल. परंतु, रोगाची तीव्रता कमी झाल्यामुळे फारसा फरक पडणार नाही. सध्या जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 61 टक्के लोकांना कोरोना लशीचा किमान एक डोस मिळाला आहे, असे गेट्स यांनी सांगितले.

आरोग्यसेवा सुधारण्यासाठी मेसेंजर आरएनए (mRNA) तंत्रज्ञान नक्कीच मदत करेल. पुढे येणाऱ्या महामारीसाठी तयार होण्याची किंमत जास्त असणार नाही. हे काही जागतिक तापमानवाढीसारखे नाही. आपण तर्कास प्रमाण मानत असू तर आपण पुढच्या वेळी लवकरच यातून बाहेर पडू, असे गेट्स यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT