ऐन निवडणुकीआधी बाबा राम रहीमनं भाजपला दाखवला ठेंगा

विधानसभा निवडणुकांआधी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा तुरुंगातून बाहेर आला आहे.
Gurmeet Ram Rahim
Gurmeet Ram RahimSarkarnama
Published on
Updated on

चंडीगड : पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांआधी डेरा सच्चा सौदाचा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) हा तुरुंगातून बाहेर आला आहे. हरियानातील भाजप (BJP) सरकारने त्याला 21 दिवसांचा फर्लो रजा मंजूर केली आहे. पंजाबमध्ये उद्या (ता.20) मतदान होत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राम रहीमने भाजपला ठेंगा दाखवल्याचे समोर येत आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

पंजाबमध्ये उद्या विधानसभेसाठी मतदान (Assembly Election) होत असून, त्याआधी डेऱ्यात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप सरकारने राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढल्याने तो पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी आशा होती. त्याच्या निर्णयाकडे अनेक राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. आता त्याने एकाच पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देणे टाळले आहे. त्याने भाजपसह अकाली दल आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. राम रहीमच्या भूमिकेमुळे इतर राजकीय पक्षांना दिलासा मिळाला असला तरी भाजपची निराशा झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर डेऱ्यांतून अनुयायांना तोंडी संदेश पाठवले जात आहेत. राम रहीमने कोणत्याही एका पक्षाला मतदानाचा आदेश दिलेला नाही. याऐवजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवार निवडून त्याला मतदान करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यात भाजपसह अकाली दल आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाऐवजी उमेदवार हा निकष लावण्यात आला आहे. संबंधित उमेदवाराने आतापर्यंत डेऱ्याला किती मदत केली, याच्या आधारे डेऱ्याने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. राम रहीमचा आपल्या सगळ्या उमेदवारांना पाठिंबा मिळेल, या आशेवर असलेल्या भाजपच्या मनसुब्यावर मात्र, पाणी फेरले आहे.

राम रहीमचे पंजाबमध्ये माझा, माळवा आणि दोआबा या विभागात डेरे आहेत. तेथे त्याला मानणारा वर्ग अधिक आहे. याचबरोबर हरियानातील सिरसा जिल्ह्यात त्याचा प्रमुख डेरा आहे. माळवा विभागात राम रहीमची ताकद अधिक असून, तेथील तब्बल 69 जागांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. पंजाबमधील 2007, 2012, 2017 मधील विधानसभा निवडणुकीत डेराने महत्वाची भूमिका बजावली होती. याचसोबत डेराने 2014 ची लोकसभा आणि हरियानातील विधानसभा निवडणुकीत मोदींना पाठिंबा दिला होता.

Gurmeet Ram Rahim
एकनाथ खडसे म्हणाले, मी टरबुज्या म्हणणार नाही पण...

राम रहीमचे पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका (Assembly Election) डोळ्यासमोर ठेवून भाजपने त्याला तुरुंगातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशात या दोन्ही राज्यात राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. त्यामुळे त्याला 21 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. भाजपने राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढून मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. राम रहीम हा 2017 पासून तुरुंगात आहे.

Gurmeet Ram Rahim
जितेंद्र आव्हाड अन् एकनाथ शिंदे एकत्र येऊन भाजपला देणार धक्का!

साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये सुनावली होती. नंतर 2021 मध्ये त्याला 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. डेरा व्यवस्थापक रणजितसिंग यांच्या खून प्रकरणात राम रहीम आणि चौघांना केंद्रीय विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. राम रहीम 13 लाख रुपये तर इतर चौघांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रणजितसिंग याचा 2002 मध्ये खून करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com