sarkarnama
sarkarnama
देश

धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या नामफलकाला काळे फासले

सरकारनामा ब्युरो

नोएडा (उत्तर प्रदेश) : ग्रेटर नोयडातील राजा मिहीर भोज (Raja Mihir Bhoj) यांच्या पुतळ्याखालील नामफलकावरील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व इतर भाजप नेत्यांच्या नावाला काळे फासल्याचे उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. गेल्याच आठवड्यात आदित्यनाथ यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते.

योगी आदित्यनाथ (cm Yogi Adityanath)यांच्याबरोबर भाजपचे राज्यसभा खासदार सुरेंद्र सिंह नागर आणि आमदार तेजपाल नागर यांच्या नावालाही काळे फासल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी गर्जुर समुदायातील काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गुर्जर समुदायाचे राजपूत समुदायाशी वितुष्ट आहे.

नवव्या शतकातील राजा मिहिर भोज हा आपल्याचा समुदायाचा असल्याचा दोन्ही समुदायांचा दावा आहे. राजा भोज यांच्या नावापुढे गुर्जर लावण्याचा गुर्जर समाजाचा आग्रह होता. पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमातही दोन्ही समुदायांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोरच संघर्षही झाला होता. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT