बलात्काराचे राजकारण आमदार सीमा हिरेंना पडले महागात!

कारवाई सुरु असतानाच पोलिस ठाण्यात जाऊन आमदार सीमा हिरे यांनी आंदोलन केले.
BJP Seema Hire agitation at police station
BJP Seema Hire agitation at police stationSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : पॅरोलवर (Parol) सुटून आलेल्या आरोपीने बलात्कार (Rape) सिडको (Cidco) भागात बलात्कार केला. या घटनेतील आरोपीस पोलिसांनी (Police) विशेष प्रयत्न करून अटक (Arrest) केली. ही कारवाई सुरु असतानाच पोलिस ठाण्यात जाऊन आमदार सीमा हिरे (Seema Hire) यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. याबात पोलिसांनी (Police file FIR)थेट गुन्हा दाखल केल्याने ते चांगलेच अंगलट आले.

BJP Seema Hire agitation at police station
बलात्कार करून पळणाऱ्या गुन्हेगारास तासाभरातच अटक!

शहरात काल पॅरोलवर सुटलेल्या नितीन पवार या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने सिडको भागात एका महिलेला चाकुचा धाक दाखवून बलात्कार केला. त्याची तीव्र प्रतिक्रीया उमटली. पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गांभिर्याने घेत विविध पथकांना संशयीताच्या अटकेसाठी कार्यरत केले. तास ते दोन तासात पळून जाण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटक देखील केली.

आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर होऊन वातावरण चिघळले व त्याचे रूपांतर आंदोलन झाले. आंदोलन करीत घोषणाबाजी केल्याने पोलिस निरीक्षक हतबल झाले होते. यावेळी पोलिसांनी जास्त गर्दी कराल तर १४४ कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात येईल असे ठणकावून सांगितले.

BJP Seema Hire agitation at police station
आमदार कांदेंना अंडरवर्ल्डची धमकी; भुजबळांनी उचलले हे पाऊल

संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट पोलिस ठाण्यातच हे आंदोलन करत घोषणाबाजी केली. वातावरण चिघळल्याचे बघून निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी आमदार सीमा हिरे यांच्याशी बोलणे केले. मात्र कार्यकर्ते थांबले नाहीत.

त्यानंतर उपायुक्त विजय खरात यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आमदार सीमा हिरे व त्यांच्या ससकाऱ्यांनी ठाण्यात ठिय्या मांडत ठाकरे सरकार व पोलिस प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. यानंतर उपायुक्त विजय खरात यांनी सामोपचाराने आंदोलनकर्त्यांची समजूत काढत आरोपीला अटक करणार असल्याचे आश्वासन दिले.

BJP Seema Hire agitation at police station
भुजबळांविरोधात याचिका मागे घेण्यासाठी कांदे यांना धमकी ?; पाहा व्हिडीओ

पोलिसांची कारवाई सुरु असताना राज्यात ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाकडून विविध घटनांवर राजकीय प्रतिक्रीया दिली जाते. तसाच काहीसा घाईघाईत प्रकार भाजपने येथे केला. संशयीताला अटकेची कारवाई सुरु असतानाच पोलिस ठाण्यात जमलेल्या आमदार व त्यांच्या सहाकाऱ्यांनी घोषणाबाजी व आंदोलन सुरु केले. त्याने पोलिस ठाण्याच्या कामातही अडथळा आला, असा प्रशासनाचा दावा आहे. याबाबत अतिशय काटेकोर व शीस्तबद्ध असलेल्या पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या राजकीय आंदोलनाची गंभीर दखल घेतली. आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावर या सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अंबड पोलिसांत आमदार हिरे, नगरसेविका छाया देवांग, प्रतिभा पवार, हर्षा फिरोदीया, अलका आहेर, कावेरी घुगे, मुकेश शहाणे, जगन पाटील, अविनाश पाटील, शिवाजी बरके, राहूल गणोरे, बाळासाहेब पाटील, किरण गाडे, पिंटु उर्फ उत्तम काळे, डॅा वैभव महाले, राकेश ढोमसे, अॅड अतुल सानप, अमोल पाटील आदीसह विविध कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे बलात्कारानंतर घडलेल्या घडामोडींत हे आंदोलन चांगलेच अंगलट आले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com