Uddhav Thackeray, Gulabrao Patil sarkarnama
देश

Gulabrao Patil : 'उंदराला सापडली चिंधी, इथं ठेवू का तिथं असं झालंय' ; गुलाबराव पाटलांचे शिवसेनेला सडेतोड उत्तर

Gulabrao Patil : शिंदे सरकारचं खातेवाटप झाले. त्यावरुन शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटावर टीका केली होती. त्याला गुलाबराव पाटलांनी सडकून उत्तर दिलं आहे.

सरकारनामा ब्युरो

जळगाव :राज्यातील सत्तासंघर्षांपासून शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र 'सामना'तून शिंदे गटातील आमदारांवर सातत्याने टीका होत आहे. याला राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्यु्त्तर दिले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

'भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी. भाजपने डाव साधलाय. महत्वाची खाती आपल्याकडे ठेवलीत आणि शिंदेगटाला कमी महत्वाची खाती दिली' अशी टीका दैनिक सामनातून नुकतीच करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी 'सामना'वर निशाणा साधला आहे. सामना (Saamana)च्या अग्रलेखावर पाटलांनी टीकेचे बाण सोडले.

भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महिनाभर मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला.काल (रविवारी) शिंदे सरकारचं खातेवाटप झाले. त्यावरुन शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटावर टीका केली होती. त्याला गुलाबराव पाटलांनी सडकून उत्तर दिलं आहे.

दैनिक सामनातून होत असलेली टीका म्हणजे 'उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेवू, एवढंच काम चाललंय' अशा शब्दांत पाटलांनी 'सामना'ची खिल्ली उडवली आहे. "सरकारमध्ये काम करताना कोणाकडे कोणतं खातं, यापेक्षा सरकारची सामूहिक जबाबदारी असते. मी पाणीपुरवठा मंत्री आहे म्हणजे माझी इतर खात्यावर जबाबदारी नाहीये का? मंत्र्यांची जबाबदारी राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते. त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे विरोधकांना काहीच सापडलं नाही म्हणून अशी टीका सुरू आहे," असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT