मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा काल (रविवारी) पहाटे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या (Mumbai-Pune Expressway) सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेटेंच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मेटेंचा अपघात झाला की घातपात अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर चौकशी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानेही संबंधित कंपनीला महामार्गावर रस्ता सुरक्षेसाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम'(ITMS) बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयटीएमएस प्रणालीमुळे प्रवास सुरक्षित होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा आहे.
आयटीएमएस (Intelligent Traffic Management System) प्रणाली सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतुकीचे नियम मोडणे कठीण होणार आहे. वाहनचालकांवर लक्ष ठेवता येईल. त्यामुळे अपघात रोखण्यात यश येईल आणि प्रवास सुरक्षित होईल.
2019 मध्ये, एमएसआरडीसीने या प्रणालीसाठी निविदा काढल्या होत्या. याबाबत 3 ऑगस्ट रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. काही दिवसांत काम सुरू होणार असून, अटींनुसार नऊ महिन्यांत काम पूर्ण होईल.
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. या 94 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरून दररोज सुमारे 60 हजार वाहने धावतात.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण
ही यंत्रणा उभारण्यासाठी 160 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थापित होऊन अपघाताचा धोका टळेल.
अचूक टोलवसुली करणेही सोपे होणार आहे.
संपूर्ण रस्ता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली असेल.
वाहनांचा वेग तपासण्यासाठी सरासरी स्पीड डिटेक्शन सिस्टीम आणि लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम 39 ठिकाणी बसवण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.