Amit Shah News : Sarkarnama
देश

Amit Shah News : घराणेशाहीवर टीका करणाऱ्या अमित शहांना मंत्री स्टॅलिनचा सवाल; 'तुमच्या मुलाने क्रिकेटमध्ये किती धावा..'

Amit Shah On Tamil Nadu Dynastic Politics : "तामिळनाडूतील घराणेशाहीच्या राजकारणाला आणि भ्रष्टाचार कायमचे घालवण्यासाठीची ही यात्रा आहे.."

सरकारनामा ब्यूरो

Tamil Nadu News : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर होते. तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये शहा यांनी शुक्रवारी (२८ जुलै) 'एन मन, एन मक्कल’ म्हणजेच 'माझी जमीन - माझे लोक' या यात्रेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी बोलताना अमित शहा यांनी तामिळनाडूच्या राज्य सरकारवर सडकून टीका केली.

तामिळनाडूतील घराणेशाहीच्या राजकारणाला संपवण्यासाठी आणि भ्रष्टाचार कायमचे घालवण्यासाठीची ही यात्रा आहे, असे शहा म्हणाले होते. यावर आता तामिळनाडू सरकारमधील क्रिडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पलटवार केला आहे.

क्रिडामंत्री असलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी अमित शहांवरच टिकेचा बार उडावलेला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मध्ये जय शहा यांच्या पदाबाबत स्टॅलिन यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे पुढील काळात तामिळनाडूमध्ये राज्य पातळीवर भाजप आणि द्रमुकमध्ये राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी शाह यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “लोकांमध्ये निवडणूक लढवून मी आमदार झालो. यानंतर मला सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली. पण, मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विचारायचं आहे, तुमचा मुलगा जय शहा हा बीसीसीआयच्या सचिवपदी कसा काय बसला आहे? जय शहाने आजपर्यंत किती क्रिकेटचे सामने खेळले आहेत? क्रिकेटमध्ये त्याने किती धावा काढल्या?” अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी शहा यांना घराणेशाहीच्या राजकारणावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT